पावसाळ्यात गर्भवती महिलांनी 5 गोष्टींची घ्यावी काळजी

पावसाळ्यात गर्भवती महिलांनी 5 गोष्टींची घ्यावी काळजी

पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात आणि थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी गर्भवती महिला आणि तिच्या बाळावरही परिणाम होऊ शकतो.

  • Last Updated: Aug 6, 2020 02:35 PM IST
  • Share this:

पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी तर विशेष लक्ष द्यायला हवे. या काळात थोडं जरी दुर्लक्ष केलं तर तब्येत बिघडू शकते. म्हणून गर्भवती महिलांनी स्वतःसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

संतुलित पौष्टिक आहार

आई आणि बाळासाठी पावसाळ्यातसुद्धा संतुलित आणि पौष्टिक आहारची गरज असते. हा काळ असा असतो जेव्हा शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. म्हणून असा आहार घ्यावा ज्यात प्रथिने अधिक आहेत. या काळात गरम खाद्य पदार्थ खावे, सूप घेणंही उत्तम असते. ताजे खाद्यपदार्थ खावे. पालक, कोबी यासारख्या भाज्या टाळाव्यात कारण त्यात किटाणू असण्याची शक्यता जास्त असते.

पातळ पदार्थांची कमतरता पडू नये

वातावरणात आर्द्रता वाढलेली असते, तापमान कमी झालेले असते, वातावरण सुखद असते. या वातावरणात काही वेळा गर्भवती महिलांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे मळमळ होणे, डोकेदुखी, बेशुद्ध होणे यासारख्या तक्रारी उद्भवतात. myupchar.com च्या डॉ. आकांक्षा मिश्रा यांचे सांगणे आहे की, शरीरातील पाणी कमी झाले तर क्षार, शर्करा आणि मिठाचे संतुलन बिघडते. म्हणून पातळ पदार्थ खावे. आहारात नियमितपणे नारळ पाणी आणि रस प्यावे.

व्यक्तिगत स्वच्छता

myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांनी सांगितलं, स्वस्थ आणि रोगमुक्त राहण्यासाठी स्वच्छतेबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. व्यक्तिगत स्वच्छतेच्या बाबतील अनेक लोक चूक करतात, त्यांना याविषयी माहितीही नसते. जरी आपण आपल्या आसपासच्या स्वच्छतेची काळजी घेतो तरीही अनेकदा पावसाळ्यात संसर्ग होतो. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने किटाणू शरीरापर्यंत पोहोचतातच, त्याने बाळावर परिणाम होतो. जर बाळाला काही झालं तर डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकत नाहीत आणि मग नैसर्गिक उपचार करावे लागतात. ज्याचा परिणाम व्हायला वेळ लागतो. म्हणून प्रतिबंध हाच उत्तम उपाय आहे.

हंगामानुसार कपडे घाला

पावसाळा असो की अन्य ऋतू , गर्भवती महिलांनी आरामदायक कपडे घालायला हवे. सूती कपडे सगळ्यात चांगले. सिंथेटिक कपडे टाळा त्यात घाम शोषला जात नाही आणि आणि मग त्वचेवर डाग पडतात.

योग्य चपला घाला

जर घराबाहेर फिरणं आवडत असेल तर गर्भवती महिलांनी योग्य चपला घालाव्या. कारण गर्भावस्थेच्या काळात निसरड्या जागेवर सावधपणे चालावे लागते. अगदी जे रस्ते आपल्याला माहित आहेत तिथेसुद्धा कारण चालताना जरा जरी पाय चुकीचा पडला तरी संतुलन जाऊ शकते, त्याने गर्भात वाढणाऱ्या बाळाला हानी पोहोचू शकते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गर्भधारणा कशी करावी 

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 6, 2020, 2:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading