मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अति काम आणि अति आरामही धोक्याचा; Pregnancy मध्ये नेमकं काय करावं समजून घ्या

अति काम आणि अति आरामही धोक्याचा; Pregnancy मध्ये नेमकं काय करावं समजून घ्या

अमेरिकन काँग्रेस ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिशियन ऍन्ड गायनॅकलॉजीनुसार गर्भवती महिलेच वजन गर्भ धारणेच्या काळात 11 ते 16 किलोने वाढतंच.

अमेरिकन काँग्रेस ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिशियन ऍन्ड गायनॅकलॉजीनुसार गर्भवती महिलेच वजन गर्भ धारणेच्या काळात 11 ते 16 किलोने वाढतंच.

प्रेग्नन्सीत (Pregnancy) विशिष्ट कामं चुकूनही करू नयेत आणि तशी वेळ आलीच तर काय करावं ते वाचा.

मुंबई, 24 जानेवारी : गर्भावस्थेच्या (Pregnancy) काळात महिलांच्या (Women) शरीरात विविध बदल होत असल्याने या काळात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जेव्हा स्त्री (Women) गर्भावस्थेत असते त्यावेळी तिनं खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. याचबरोबर या काळात त्यांचं वजन (Weight) वाढत असल्याने घरामध्ये काम (Household Work) करण्यास अडचणी येऊ शकतात. पण काम न केल्याने आणि फक्त आराम केल्याने गर्भावस्थेत (Pregnancy) अडचणी निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे गर्भावस्थेत महिलांनी कोणती कामं करावीत आणि कोणती नाही. याबाबत parenting.firstcry वर माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळे आई आणि बाळ दोन्हीही सुदृढ राहतील.

गर्भावस्थेच्या काळात ही कामे करू नये

1) वजनदार सामान उचलू नका

गर्भावस्थेच्या (Pregnancy) काळात महिलांचं वजन वाढतं. यामुळे कंबरेवर ताण आल्यानं त्रास होऊ शकतो. यामुळे वजनदार वस्तू आणि कामं न करता हलकी काम केल्यानं याचा फायदा होतो. गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असते.

2) केमिकल असणाऱ्या वस्तूंचा वापर टाळा

गर्भावस्थेत (Pregnancy) महिलांनी केमिकलयुक्त वस्तूंचा वापर करणं टाळा. यामध्ये तुम्ही नैसर्गिक वस्तू वापरून आरोग्याची काळजी घेऊ शकता. हातामध्ये ग्लोव्ह्ज आणि तोंड झाकून महिला आपली काळजी घेऊ शकतात.

3) पायऱ्या चढू नका

या काळात वजन वाढल्याने पायऱ्यांवरून पडण्याचा अधिक धोका असतो. यामुळे या काळात पायऱ्या चढण्याचं टाळा.

हे वाचा - तुमच्या तोंडात तर असं काही दिसत नाहीये ना? कोरोनाची नवीन लक्षणं आली समोर

4) वारंवार वाकू नका

या काळात पोटाचा घेर वाढल्यानं कंबरेत वाकण्यास अडचण येऊ शकते. यामुळे झाडू मारणं, फरशी पुसणं यासारखी वाकायला लागणारी कामं करू नयेत.

5) खूप वेळ उभं राहणं टाळा

गर्भारपणाच्या काळात जास्त वेळ उभं राहणं टाळा. यामुळे पायावर दाब येऊन त्रास होऊ शकतो. यामुळे या काळात उभे राहून स्वयंपाक करणं आणि या पद्धतीची कामं करणं टाळावं.

गर्भावस्थेत महिला करू शकतात ही कामं

1) गर्भावस्थेत महिला बसून भाज्या कापणं आणि या पद्धतीची स्वयंपाकाची कामं करू शकतात. या काळात उभं राहून भाज्या कापल्यास पायावर दबाव येऊ शकतो. यामुळे यासारखी कामं बसून केल्यास नुकसान आणि त्रास होणार नाही.

2) उभं राहून झाडू मारणं आणि फरशी पुसण्याचं काम गर्भावस्थेत केलं जाऊ शकते. पण जर यामुळेदेखील त्रास होत असेल तर या काळात हे काम करणं टाळावं.

हे वाचा - Mood Swings ठरू शकतो धोकादायक आजार; याकडे दुर्लक्ष करू नका

3) गर्भावस्थेत (Pregnancy) महिला बाथरूमदेखील साफ करू शकतात. पण यासाठी कोणत्याही केमिकलचा वापर न करता नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा. यामध्ये लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा वापरून सफाई करू शकतात.

4) याचबरोबर महिला उभे राहून भांडी देखील घासू शकतात. पण 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ उभं राहणं शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Woman