मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रसूतीनंतर बाळासह आला आणखी एक मांसाचा गोळा; दुसरा गर्भ नाही तर...; रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

प्रसूतीनंतर बाळासह आला आणखी एक मांसाचा गोळा; दुसरा गर्भ नाही तर...; रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

राखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं.

राखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं.

गरोदरपणात (Pregnancy) महिलांना अनेक समस्या उद्भवतात. पण या महिलेला मात्र अतिशय दुर्मिळ समस्येचा सामना करावा लागला.

    पुणे, 02 मे : आई होणं (Pregnancy) हा प्रत्येक महिलेसाठी एक आनंदाचा क्षण असतो. बाळाला जन्म देणं म्हणजे त्या महिलेचाच दुसरा जन्म असतो. पण या आनंदासह अनेक समस्या आणि अडचणींचाही सामना महिलांना करावा लागतो. गरोदरपणात अनेक समस्या उद्भवतात. पण पुण्यातील एका महिलेला मात्र दुर्मिळ समस्येचा सामना करावा लागला. तिच्या गर्भात आणखी एक मांसाचा गोळा वाढत होता (Tumor in Pregnant woman stomach). पण तो दुसरा गर्भ नव्हता. महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक झाले. 31 वर्षांची ही महिला पहिल्यांदाच प्रेग्नंट होती. आपल्या पहिल्या बाळाला ती जन्म देणार होती त्यामुळे ती आनंदात होती. तिच्या पोटात बाळासह आणि एक मांस असल्याचं आढळलं. महिलेच्या सोनाग्राफीदरम्यान याचं निदान झालं. गर्भासह हा मांसाचा गोळाही वाढत होता. पण तो दुसरा गर्भ नव्हता. प्रेग्नन्सीच्या पहिल्या तिमाहीत याचा आकार 8*10 सेमी होता. जो तिसऱ्या तिमाहीत दुपटीपेक्षा अधिक वाढलं. रुबी हॉल क्लिनिकमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संजय देशमुख यांनी सांगितलं, सोनोग्राफीदरम्यान स्त्रीरोगतज्ज्ञांनी या गर्भवती महिलेच्या ओटीपोटात बाळासोबत एक मांसाचा गोळा दिसला. गर्भाशयाला तो चिकटलेला होता. त्यांना वाटलं हा फायब्रॉईड असावा. पण प्रेग्न्सीमध्ये जसा गर्भ वाढत गेला, तसंच हा मासांचा गोळाही वाढला. हे वाचा - प्रेग्नंट महिलेचं पोट पाहून वाटलं जुळं! पण जन्माला आलं 5.8 किलोचं 'वजनदार' बाळ महिलेची सिझेरियन डिलीव्हरी झाली, तिने एका निरोगी आणि सुदृढ बाळाला जन्म दिला. त्यावेळी त्या मांसाच्या गोळ्याचीही तपासणी करण्यात आली. "तो साधा ट्युमर नव्हता असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही त्याची बायोप्सी केली, पीईटी स्कॅन केलं तर हा सॅक्रोमा (sarcoma) असल्याचं निदान झालं", असं डॉ. देशमुख यांनी सांगितलं. सॅक्रोमा हा कनेक्टिव्ह टिश्यूसंबंधित कॅन्सर आहे. सुरुवातीला डॉक्टरांना हा युटेराइन सॅक्रोमा वाटला.  डॉ. देशमुख यांनी सांगितलं, "आम्ही सर्जरी केली आणि पाहिलं तेव्हा हा ट्युमर गर्भाशयापासून वेगळा झाला होता. ट्युमर हा रेट्रोपेरिटोनम (retroperitoneum) या आतड्यांच्या मागील भागास असलेल्या एका भागाकडून सुरू झाला होता आणि कोलोनमध्ये (colon) जात होता. हा  रेट्रोपेरिटोनल मेसेन्ट्रिकं सॅक्रोमा (Retroperitoneal mesenteric sarcoma) होता जो खूप दुर्मिळ आहे" महिलेला Mesenteric Leiomyosarcoma हा असामान्य आणि गंभीर असा आजार झाला होता. जगात अशी फक्त 25 प्रकरणं दिसून आली आहे. अशी समस्या प्रेग्नन्सीमध्ये उद्भवणे म्हणजे खूप धोक्याचं आहे. कारण गर्भाच्या वाढीसह रुग्णाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हे वाचा - दगड, माती आणि बरंच काही...; 8 महिन्यांच्या बाळाला खायला देते ही आई कारण... या महिलेची शस्त्रक्रिया करणं आव्हानात्मक होतं.  ट्युमरने महिलेच्या पोटाचा 80% भाग व्यापला होता. ट्युमर आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या रक्तवाहिन्या अगदी जवळ होत्या. पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीरित्या हा ट्युमर बाहेर काढण्यात आला. डॉ. देशमुख म्हणाले, "सर्जरी खूपच जास्त वेळ चालली कारण आम्हाला जवळपास सर्वच अवयव वाचवायचे होते. त्यांना हानी पोहोचू न देता शस्त्रक्रिया करायची होती. अशा केसेस याआधी आढळल्या आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला पण अशी प्रकरणं खूपच दुर्मिळ आहेत. त्यामुळे आम्ही हे प्रकरण जर्नलमध्ये द्यायचं ठरवलं" इंडियन जर्नल ऑफ कॅन्सरमध्येही (Indian Journal Of Cancer) हे प्रकरणं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. ती बरीसुद्धा झाली. पण दीड वर्षांनंतर महिलेमध्ये पुन्हा कॅन्सरची लक्षणं दिसून आली. पण केमोथेरेपीचा तिच्यावर चांगला परिणाम दिसून आला. आता ती अगदी सर्वसामान्य आयुष्य जगते आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health, Pregnant

    पुढील बातम्या