या प्रकारच्या पुरुषांना असतो डिप्रेशनचा अधिक धोका, संशोधनात झालं स्पष्ट

नैराश्यग्रस्त होण्याच्या धोक्यासोबतच त्यांच्यावर उपचार करणंही इतरांपेक्षा जास्त कठीण असतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 04:08 PM IST

या प्रकारच्या पुरुषांना असतो डिप्रेशनचा अधिक धोका, संशोधनात झालं स्पष्ट

गरोदर राहणाऱ्या ट्रान्सजेंडर पुरुषांमध्ये डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण इतरांपेक्षा अधिक असतं. एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे की, नैराश्यग्रस्त होण्याच्या धोक्यासोबतच त्यांच्यावर उपचार करणंही इतरांपेक्षा जास्त कठीण असतं. 'मॅच्योरीटस' नावाच्या एका जनरलमध्ये छापून आलेल्या संशोधनानुसार, 35 किंवा त्याहून जास्त वयाच्या गरोदर ट्रान्सजेंडरच्या मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास करण्यात आला.

रटगर्स रॉबर्ट वुड जॉनसन मेडिकल स्कूलमधअये ओबस्टेरिक्स, स्त्री रोग आणि प्रजनन विभागात असिस्टंट क्लीनिकल प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या जस्टिन ब्रँड्टने सांगितलं की, 'अमेरिकेत 1.4 दशलक्ष ट्रान्सजेंडरने आपलं ट्रान्सिजन केलं आहे. असं असलं तरी अमेरिकेतले मेडिकल प्रोवायडर अजूनही त्यांना वैद्यकीय मदत करण्यास तेवढी सक्षम नाहीये किंवा तयार नाहीयेत.'

अमेरिकेतील ट्रान्सजेंडर सर्वेमध्ये जवळपास 28 हजार ट्रान्सलोकांपैकी 40 टक्के लोकांनी जवळपास नऊ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा आकडा आणि आत्महत्या करण्याचा धोका अजून वाढतो जेव्हा ट्रान्सजेंडर पुरुष गरोदर असतो.

ट्रान्सजेंडर पुरुषाला स्त्रीच्या शरीरात कैद असल्यासारखं वाटतं. अशावेळी तो ट्रान्सिजन करून घेतो. ही एक मोठी प्रक्रिया असून याला बराच काळ लागतो. या काळात जर ट्रान्सजेंडर पुरुष, ज्याचं शरीर स्त्रीचं आहे, तो गरोदर राहिला तर सहाजिकच त्याला पुढचं संपूर्ण आयुष्य स्त्रीच्याच शरीरात रहावं लागतं. याच कारणामुळे हे पुरुष नैराश्यग्रस्त होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, जवळपास 25 टक्के ट्रान्सजेंडरांना रुग्णालयात निकृष्ट दर्जाची आरोग्य सेवा मिळते. गरोदर ट्रान्सजेंडर पुरुषांकडे इतरांपेक्षा जास्त लक्ष द्यावं तसंच त्यांना वैद्यकीय सेवाही लागते.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

70 वर्षांची म्हातारी हत्तीण आठवतेय का? अशक्तपणामुळे अखेर ती कोसळली

कंबरदुखीपासून त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय एकदा करून पाहा!

या पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात टिकवू शकता भाज्या आणि कडधान्य

वेळीच सावध व्हा, या 7 कारणांमुळे घरातून दूर जाईल लक्ष्मी!

VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...