मुंबई, 30 ऑक्टोबर : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या करीना आपला प्रेग्नन्सी पीरिअड एन्जॉय करते आहेत. तिचं कुटुंबही तिची विशेष काळजी घेतं आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी करीना आपल्या प्रेग्नन्सीनंतरचेही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतं. असाच एक फोटो तिनं नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची एक खास व्यक्ती तिची मालिश करताना दिसते आहे.
प्रेग्नन्सीचा कालावधी महिलांसाठी खूप आव्हानात्मक असतो. महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यांच्या आहाराची, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. करीनाच्या कुटुंबातील प्रत्येक जण तिची अशीच काळजी घेत आहेत. मात्र प्रत्येक महिलेला या कालावधीत सर्वात जवळची वाटते ती आई आणि करीनाची आईदेखील तिची काळजी घेत आहे.
करीनाने शेअर केलेल्या फोटोत तिची आई तिच्या डोक्याला मालिश करताना दिसते आहे. करीनाने या फोटोला कॅप्शन दिलं आहे, 'आईच्या हाताने मालिश' आपल्या आईच्या हाताने मालिश करून घेताना करीनाच्या चेहऱ्यावरदेखील त्याचं समाधान दिसून येतं आहे.
या फोटोत करीना कफ्तान घालून दिसते. तिचं बेबी बंपही दिसत आहे आणि चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोदेखील दिसतो आहे. या फोटोवर करीनाची खास मैत्रिणी अभिनेत्री मलायका अरोरानेही so cute अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय करीनाच्या चाहत्यांच्याही यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत.
करीना कपूर आणि सैफ अली खान दोघांनीही ऑगस्टमध्ये गूड न्यूज दिली होती. आपण दोघंही दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यादरम्यानही करीनानं आपलं काम सुरू ठेवलं. नुकतीच तिनं आपली आगामी फिल्म लाल सिंग चड्ढाचं शूटिंग संपवलं. तिनं शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिर खानसह एक फोटो शेअर करत याची माहिती दिली होती. कोरोनाच्या संकटात सुरक्षेची काळजी घेत, खबरदारी राखत आम्ही शूटिंग संपवल्याचं तिनं सांगितलं.