मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pregnancy Tips : गरोदरपणात कॉफी पिणे सुरक्षित असते का? आरोग्यावर कसा होतो परिणाम?

Pregnancy Tips : गरोदरपणात कॉफी पिणे सुरक्षित असते का? आरोग्यावर कसा होतो परिणाम?

गरोदर महिला खाण्यापिण्याबाबत खूप जागरूक असतात. त्यामुळे कधी-कधी त्या कॉफी घेणे बंद करतात. कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, मात्र दिवसभरात एक कप कॉफी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.

  मुंबई, 3 ऑगस्ट : दिवसाची सुरुवात कॉफीने होईपर्यंत दिवस अपूर्ण वाटतो. अनेक महिलांना कॉफी प्यायला खूप आवडते, पण गरोदरपणात कॉफी पिणे किती चांगले आहे. ही माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गरोदरपणात महिला खाण्यापिण्याबाबत खूप जागरूक असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्या जास्त कॅफिनमुळे कॉफी घेणे बंद करतात. असे मानले जाते की कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, परंतु दिवसभर एक कप कॉफी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. गरोदरपणातही कॉफीचे सेवन करता येते पण कॉफी एका मर्यादेत प्यावी. जास्त प्रमाणात कॅफीन घेणे धोकादायक ठरू शकते. गरोदरपणात कॉफीचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया. कॉफी एक कपपेक्षा जास्त घेऊ नका गर्भधारणेदरम्यान मर्यादित प्रमाणात कॅफिनयुक्त कॉफी पिणे सुरक्षित मानले जाते. व्हेरीवेल फॅमिलीनुसार, गर्भवती महिलांनी दररोज 200 मिलीग्रामपेक्षा जास्त कॉफी घेऊ नये. कॉफीच्या अतिसेवनामुळे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो.

  Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील

  जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करू नका कॉफी हा केवळ कॅफीनचा मुख्य स्रोत नाही, तर तुम्ही दिवसभर जे चहा, सोडा आणि चॉकलेट वापरता त्यातही भरपूर कॅफीन आढळते. त्यामुळे दिवसात जास्त कॅफिनयुक्त पदार्थ खाणे टाळावे. ऊर्जेसाठी खाल्लेल्या एनर्जी बारचे लेबलही तपासले पाहिजे. कारण त्यात जास्त प्रमाणात कॅफिन वापरले जाते. ऊर्जा मिळते गरोदरपणात कॉफी प्यायल्याने काही विशेष आरोग्य फायदे मिळत नाहीत, पण जर शरीराला याची सवय असेल तर एक कप घेणे योग्य असतो. एक कप कॉफीने शरीराची एनर्जी लेव्हल नक्कीच वाढवता येते. तसेच तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते. डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर कॉफी सोडल्याने नुकसान होऊ शकते कॉफी पिण्याचे व्यसन असलेल्या महिलांनी गरोदरपणात कॉफी घेणे बंद केल्यास त्रास सहन करावा लागतो. कॉफीचे सेवन बंद केल्याने थकवा, तणाव आणि चक्कर येऊ शकते जे बाळासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कॅफिनयुक्त कॉफीचे सेवन बंद करण्यापेक्षा कमी करणे योग्य.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Pregnancy

  पुढील बातम्या