मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शुक्राणूही दाखवतात 'एकी'चं बळ; नव्या संशोधनातून निष्कर्ष

शुक्राणूही दाखवतात 'एकी'चं बळ; नव्या संशोधनातून निष्कर्ष

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जेव्हा पुरुषाचे शुक्राणू आणि महिलेची बीजांडं एकत्र येतात तेव्हा त्यातून गर्भ तयार होतो, असं आपण बायोलॉजीमध्ये शिकलो आहे. या प्रक्रियेवर आतापर्यंत अनेक वेळा संशोधन झालं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

महिलेच्या गर्भात भ्रूणनिर्मिती नेमकी कशी होते, यावर आतापर्यंत जगभरात बरीच संशोधनं झाली. त्यातून दरवेळी वेगवेगळ्या आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. नवा जीव जन्माला येणं ही एक महत्त्वपूर्ण घटना असते. कारण मोठ्या प्रक्रियेतून ही गोष्ट प्रत्यक्षात येत असते. पुरुषाचे शुक्राणू म्हणजेच स्पर्म्स आणि स्त्रीच्या शरीरातलं बीजांड एकत्र येतात तेव्हा त्यातून गर्भ तयार होतो. तसंच, एक शक्तिशाली शुक्राणू बाकीच्यांना मागे टाकून बीजांडापर्यंत पोहोचतो, अशी प्रक्रिया आतापर्यंत ज्ञात आहे. ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नसते. या अतिशय गुंतागुंतीच्या आणि रहस्यमयी प्रक्रियेवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. त्यातून एक नवा निष्कर्ष समोर आला आहे. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये शुक्राणू मादीच्या बीजांडांपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रितपणे म्हणजेच गटानेही प्रवास करतात, असं या संशोधनातून समोर आलं आहे. 'आज तक'ने या संशोधनाविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जेव्हा पुरुषाचे शुक्राणू आणि महिलेची बीजांडं एकत्र येतात तेव्हा त्यातून गर्भ तयार होतो, असं आपण बायोलॉजीमध्ये शिकलो आहे. या प्रक्रियेवर आतापर्यंत अनेक वेळा संशोधन झालं आहे. सर्वात वेगवान आणि शक्तिशाली शुक्राणू कोट्यवधी शुक्राणूंना मागे टाकून बीजांडात प्रवेश करतो आणि गर्भ तयार होतो, असं या संशोधनांमधून स्पष्ट झालं; पण या प्रक्रियेवर नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात वेगळंच आढळून आलं आहे. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये शुक्राणू बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रितपणे म्हणजेच गटाने धावतात, असं त्यात दिसून आलं आहे.

अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांच्या पथकाने हा दावा केला आहे. फर्टिलायझेशनच्या जवळपास सर्व सिद्धांतांमध्ये असंच चित्र उभं करण्यात आलं आहे, की शुक्राणूंमध्ये बीजांड फर्टिलाइझ करण्यासाठी स्पर्धा असते. परंतु, मायक्रोस्कोपच्या स्लाइड्सवर आणि प्रयोगशाळेतल्या काही उपकरणांच्या आधारे करण्यात आलेल्या या संशोधनातून काही वेगळेच निष्कर्ष समोर आले आहेत, असं एका संशोधकानं सांगितलं.

(अंग खाजतंय? तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम)

शुक्राणूंच्या प्रवासाच्या रहस्याची उकल करण्यासाठी संशोधकांनी बैलाचे 10 कोटी शुक्राणू एका सिलिकॉन ट्यूबमध्ये इंजेक्ट केले. यात त्यांनी तेच द्रवपदार्थ भरले होते जे गायींच्या गर्भाशयात असतात. त्यानंतर संशोधकांनी शुक्राणूंच्या प्रवाहाचं निरीक्षण करण्यासाठी एक सीरिंज पंप (अत्यल्प औषध देण्यासाठी वापरले जाणारं टूल) वापरला. द्रवपदार्थाचा प्रवाह नसताना जे समूहातले शुक्राणू होते ते वेगवेगळ्या शुक्राणूंच्या तुलनेत एका सरळ रेषेत तरंगत होते. जेव्हा प्रवाह सुरू झाला तेव्हा शुक्राणूंचा समूह वरच्या दिशेनं पोहू लागला; मात्र जे एकेकटे फिरणारे शुक्राणू होते ते तसं करू शकले नाहीत. जेव्हा प्रवाह वाढला तेव्हा एकट्या शुक्राणूंच्या तुलनेत शुक्राणूंचा समूह अधिक चांगल्या पद्धतीनं द्रव पदार्थ पार करत असल्याचं दिसून आलं. यादरम्यान एकटे शुक्राणू समोर येणाऱ्या द्रवाच्या प्रवाहात वाहून गेले, असं संशोधकांनी सांगितलं.

शुक्राणूंचे समूह अतिशय वेगाने पुढे जात असताना एकटे शुक्राणू पुढे जाताना दिसले नाहीत. एकटे शुक्राणू कधीकधी समूहाचा भाग बनत होते आणि नंतर वेगळे होत होते. ही प्रक्रिया एखाद्या सायकल रेसप्रमाणे दिसली. सायकल रेसमध्ये ज्याप्रमाणे समोरच्या वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून सायकलस्वार काही ठरावीक क्षेत्रात एकमेकांशेजारी सायकल चालवत प्रवास पूर्ण करतात, त्याचप्रमाणे ही सर्व प्रक्रिया होती.

(ब्रेस्टचा आकारही सांगतो महिलांचा स्वभाव; 'ती' नेमकी कशी इथं पाहा)

याबाबत संशोधन पथकातले सदस्य चियांग कुआन टुंग म्हणाले, "आम्ही ही सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत बैलाच्या शुक्राणूंवर संशोधन केलं. कारण बैलाचे शुक्राणू मानवी शुक्राणूंशी मिळतेजुळते असतात. बैलाच्या शुक्राणूंनाही मानवी शुक्राणूप्रमाणे हेड आणि टेल असते. जेव्हा पुरुष आणि महिलेचे शारीरिक संबंध येतात, तेव्हा पुरुषाचे लाखो शुक्राणू बाहेर पडून लगेचच बीजांडापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू करतात. अनेक शुक्राणू दोन-तीन किंवा चारच्या गटात बीजांडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्हाला या संशोधनादरम्यान दिसून आलं. शुक्राणूंचा बीजांडापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसतो. त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येतात, ज्यामध्ये बहुतांश शुक्राणू स्त्रीच्या लैंगिक अवयवांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांमुळे मार्गातच नष्ट होतात."

"शुक्राणू ही यंत्रणा अवलंबतात, जेणेकरून त्यांच्यातल्या शुक्राणूंपैकी किमान काही शुक्राणू तरी बीजांडापर्यंत पोहोचू शकतील. कारण त्याशिवाय त्यांच्यातला एकही शुक्राणू गर्भाशयातल्या द्रवासमोर जिवंत राहू शकत नाही. योनी आणि गर्भाशयातल्या घट्ट आणि वेगानं वाहणाऱ्या द्रवामधून वाहण्यात शुक्राणूंचे गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते उर्वरित शुक्राणूंसाठी मार्ग तयार करण्यासाठी हे द्रव वेगवेगळ्या दिशेला वळवतात आणि तो पातळ करतात. आमचं हे संशोधन वंध्यत्वाची अज्ञात कारणं शोधून त्यावर उपचार करण्यासाठी मदत करील. तसंच भविष्यात इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशनच्या इतर उपचारांसाठी चांगल्या शुक्राणूंची निवड करण्याकरितादेखील हे संशोधन उपयुक्त ठरेल," असं चियांग यांनी सांगितलं.

First published: