मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'या' कालावधीत संबंध ठेवल्यास गर्भवती राहण्याची शक्यता

'या' कालावधीत संबंध ठेवल्यास गर्भवती राहण्याची शक्यता

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

कोणतंही गर्भनिरोधक साधन न वापरता शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा सहज होते, असा काही स्त्रियांचा समज असतो. असं घडलं नाही तर त्या चिंतेत पडतात. गर्भधारणेच्या प्रक्रियेविषयी पूर्ण माहिती नसल्यास असं होऊ शकतं. काही महिला घरीच प्रेग्नन्सी टेस्ट करून गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासतात; मात्र या टेस्टसोबतच वैद्यकीय तपासणीदेखील महत्त्वाची असते.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रत्येक स्त्रीसाठी मातृत्व अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंतचा कालावधी स्त्रीला नवा अनुभव देणारा असतो. हा कालावधी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशीलदेखील असतो. आई होणं हा स्त्रीसाठी सर्वांत आनंदाचा क्षण असतो. मातृत्वासाठी अनेक स्त्रिया खूप नियोजन करतात. गर्भधारणा ते प्रसूती ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या संपूर्ण प्रक्रियेतदरम्यान स्त्रीमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीसाठी लागणारा कालावधी, तसंच प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी या सर्व गोष्टींविषयी प्रत्येक स्त्रीनं जाणून घेणं आवश्यक आहे. 'आज तक'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एखाद्या स्त्रीच्या गर्भात एक नवा जीव तयार होणं ही सामान्य प्रक्रिया नक्कीच नाही. तसंच ही प्रक्रिया झटपट होत नाही. त्यासाठी खूप कालावधी लागतो. कोणतंही गर्भनिरोधक साधन न वापरता शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा सहज होते, असा काही स्त्रियांचा समज असतो. असं घडलं नाही तर त्या चिंतेत पडतात. गर्भधारणेच्या प्रक्रियेविषयी पूर्ण माहिती नसल्यास असं होऊ शकतं. काही महिला घरीच प्रेग्नन्सी टेस्ट करून गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासतात; मात्र या टेस्टसोबतच वैद्यकीय तपासणीदेखील महत्त्वाची असते.

गर्भधारणेचं नियोजन करत असाल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या प्रेग्नन्सी टेस्ट किटबाबत मनात शंका असेल, तर या काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी टेस्ट किट बनवणाऱ्या कंपन्यांचा असा दावा आहे, की हे किट 99 टक्के योग्य रिझल्ट दर्शवतं. कंपन्यांचा हा दावा पूर्णपणे बरोबर आहे. प्रेग्नन्सी टेस्टसाठी सध्याच्या काळात अनेक पर्याय उपलब्ध असताना स्त्रिया प्रेग्नन्सी टेस्ट किटचा जास्त वापर करतात. अर्थात त्यामागे काही कारणंदेखील आहेत. हे किट वापरायला सोपं आहे, तसंच ते मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होतं.

(नवा Blood Group सापडला; कशी होईल या रक्तगटाची ओळख?)

गर्भधारणेबाबत माहिती घेण्यासाठी घरी करण्यात येणारी टेस्ट आणि डॉक्टरांमार्फत केली जाणारी ब्लड टेस्ट जवळपास सारखीच असते. कारण या दोन्ही टेस्टमध्ये `एचसीजी`ची पातळी मोजली जाते. गर्भधारणेच्या पहिल्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत एचसीजीची पातळी वेगानं वाढते आणि नंतर ती हळूहळू कमी होते. परंतु, गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत हे हॉर्मोन शरीरात कायम राहतं.

"गर्भधारणेची तपासणी करण्याकरिता अनेक स्त्रिया प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर करतात. गर्भधारणेच्या तपासणीकरिता डॉक्टरमार्फत जी ब्लड तपासणी केली जाते, तितकंच हे किट सुरक्षित, अचूक आहे" असं गायनॅकॉलॉजिस्ट जोई रॉबिन्सन यांनी सांगितलं.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये एचसीजी हॉर्मोनच्या माध्यमातून गर्भधारणेविषयी रिझल्ट मिळतो. सुरुवातीच्या टप्प्यात गर्भधारणेविषयी माहिती घेण्यासाठी बहुतांश जण याच पद्धतीचा वापर करतात. पीरियड्स नियमित असतील तर शेवटच्या पीरियडच्या पहिल्या दिवसापासून चार आठवड्यांनंतर होम प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. या कालावधीतले रिझल्ट 99 टक्के अचूक असतात. सामान्यपणे प्रेग्नन्सी टेस्ट 99 टक्के अचूक असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक टेस्ट किट्सच्या माध्यमातून तुम्ही मासिक पाळी चुकल्यास त्यापूर्वीच गर्भधारणा ओळखू शकता. परंतु, तुमचे पीरियड्स पूर्णपणे नियमित असल्याची तुम्हाला खात्री असेल तेव्हाच तुम्ही या किट्सचा वापर करावा. जर पीरियड्स एरव्ही नियमित होत असतील आणि एखाद्या वेळी पीरियड्सना दोन दिवस उशीर झाला तर अशा परिस्थितीत तुम्ही होम प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता.

(त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा)

डॉक्टर गर्भधारणेची तपासणी करण्यासाठी ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला देतात. फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असलेल्यांसाठी प्रामुख्याने हा सल्ला असतो. याशिवाय कोणतीही शस्त्रक्रिया किंवा मेडिकल प्रोसिजरपूर्वी प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. तथापि, होम प्रेग्नन्सी टेस्टपेक्षा ब्लड टेस्टमधून लवकर गर्भधारणा चाचणीचे रिझल्ट स्पष्ट होतात.

अशी असते गर्भधारणेची प्रक्रिया

ओव्ह्युलेशनच्या काळात स्त्री सर्वांत लवकर आणि सहज गर्भवती होऊ शकते. स्त्रीच्या अंडाशयातून बीजांडं बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. ही प्रक्रिया पीरियड्स येण्यापूर्वी दोन आठवडे होते. यादरम्यान, बीजांडं स्त्रीच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये पुरुषाच्या वीर्यातल्या शुक्रांणूंशी मीलनासाठी थांबतात. या कालावधीला फर्टिलिटी विंडो म्हणतात. ही अशी वेळ असते जेव्हा स्त्रीचं शरीर सर्वांत जास्त फर्टाइल असतं. या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा अगदी सहज होऊ शकते. ओव्ह्युलेशनदरम्यान कोणत्याही गर्भनिरोधकाशिवाय शारीरिक संबंध ठेवले तर या काळात शुक्राणूंची बीजांडाला फलित करण्याची प्रक्रियादेखील वेगवान होते. ओव्ह्युलेशनमध्ये स्त्रीचं बीजांड 12 ते 14 तास गर्भाधान करण्यास सक्षम असतं. त्याचप्रमाणे शुक्राणू तीन ते पाच दिवस स्त्रीच्या शरीरात जिवंत राहू शकतात. या कालावधीत ते बीजांडाचं यशस्वी फलन होण्याची प्रतीक्षा करतात. त्यामुळे मूल होण्यासाठी प्लानिंग करत असलेल्यांसाठी हा कालावधी सर्वोत्तम असतो. जेव्हा बीजांड फर्टिलाइज होतं तेव्हा ते गर्भाशयाच्या आतल्या स्तरावर चिकटतं आणि त्यानंतर प्लॅसेंटा तयार होण्यास सुरुवात होते.

प्लॅसेंटा तयार झाल्यानंतर तो कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हॉर्मोन (HCG) रिलीज करतो. यालाच प्रेग्नसी हॉर्मोन असंदेखील म्हटलं जातं. गर्भधारणेनंतर 10 दिवसांनी गर्भवती महिलेच्या रक्त आणि लघवीत हे हॉर्मोन आढळून येऊ लागतं. अनेक प्रेग्नन्सी टेस्टचे निष्कर्ष या माध्यमातून स्पष्ट होतात. हे हॉर्मोन रिलीज होणं अर्थात स्रवणं म्हणजे स्त्री गर्भवती आहे असं समजावं.

तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेची अनेक लक्षणं दिसून येऊ शकतात. केवळ एक किंवा दोन लक्षणांच्या आधारे तुम्ही याबाबत निष्कर्ष काढू शकत नाही. शेवटच्या पीरियडच्या पहिल्या दिवसानंतर आठ आठवड्यांपर्यंत गर्भधारणेची प्राथमिक लक्षणं दिसत नाहीत; मात्र काही लक्षणं मासिक पाळी चुकल्यानंतर लगेच दिसू लागतात. काही सामान्य लक्षणांमध्ये चक्कर येणं, उलट्या होणं, ब्रेस्ट टेंडरनेस, थकवा, पोटात दुखणं, चव आणि वासाच्या क्षमतेत बदल होणं यांचा समावेश आहे.

गर्भधारणेचं नियोजन केलं असेल आणि होम प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर तुम्ही समाधानी असाल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज नाही. खरं तर डॉक्टरांचादेखील होम प्रेग्नन्सी टेस्टच्या रिझल्टवर पूर्ण विश्वास असतो; पण तरीही डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर अल्ट्रासाउंडसारख्या वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल आणि हेल्दी आहे की नाही हे तपासतात. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा असून, त्यांच्या सल्ल्यानुसार आहार आणि जीवनशैलीत योग्य तो बदल करावा.

जर गर्भधारणेपूर्वी काही औषधं घेत असाल तर गर्भधारणेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं ही औषधं सुरू ठेवा. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिनची औषधं किंवा तसा आहार घ्या. धूम्रपान आणि मद्यपान गर्भवती महिलांसाठी घातक असतं. त्यामुळे अशी व्यसनं असली, तर तातडीनं सोडावीत. भरपूर पाणी प्यावं. योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्यावी. तसंच तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं हलका व्यायाम सुरू करावा.

First published: