हृदयाचे आजार असताना दातांचे उपचार घेताय; अशी घ्या स्वत:ची काळजी

हृदयाचे आजार असताना दातांचे उपचार घेताय; अशी घ्या स्वत:ची काळजी

हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी इतर आजारांवर उपचार घेताना आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी.

  • Last Updated: Jul 14, 2020 06:52 PM IST
  • Share this:

हृदयाचे आजार (heart patient) असलेल्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणं जितकं आवश्यक आहे. तितकंच या रुग्णांनी इतर कुठल्याही आजारासाठी उपचार घेताना काळजी घेणंही गरजेचं आहे. विशेषतः दातांसाठी उपचार घेताना सावध असणे गरजेचे आहे. तसा दातांचा आणि हृदयाचा थेट संबध नाही. पण डॉक्टरांच्या मते, जर मौखिक स्वच्छता योग्य प्रकारे राखली नाही तर हृदयरोग असलेल्यांच्या बाबतीत तोंडातील घाण पोटात जाते आणि रक्तात मिसळली जाते आणि मग ती रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून हृदयापर्यंत जाते आणि हृदयाला हानी पोहचवते. myUpchar.com चे डॉ. आयुष पांडे यांच्या नुसार, दातांच्या साधारण वेदना घरगुती उपचारांनी ठिक होतात. पण वेदना कमी झाल्या नाही तर मात्र डॉक्टरांकडे गेलेच पाहिजे. चला तर जाणून घेऊ दातांवर उपचार घेताना हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे.

दातांच्या डॉक्टरना सांगा तुम्हाला हृदयाचा आजार आहे आणि तुम्ही कुठली औषधे घेत आहात

हृदय रुग्णांनी दातांच्या डॉक्टरकडे गेल्यावर सर्वात आधी त्यांना आपल्या आजाराविषयी आणि त्यावर काय उपचार सुरू आहेत याची माहिती दिली पाहिजे. त्यानुसार डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतील. त्यांनी डॉक्टरांना आपल्या हृदयावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पण द्यावा. म्हणजे काही अडचण आल्यास डॉक्टर त्यांच्याशी बोलू शकतील आणि मग त्यांच्या सल्ल्याने उपचार करू शकतील.

डॉक्टरांशी मनमोकळे बोला

हृदय रुग्णांच्या मनात काही भीती असेल तर त्यांनी आपल्या हृदयरोग तज्ज्ञ आणि दातांच्या डॉक्टरांशी मनमोकळे बोलले पाहिजे, त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये कुठल्याही शंका राहणार नाहीत. यामुळे डॉक्टरांना सर्व समस्या व्यवस्थित समजतील आणि ते रुग्णाला सर्व गोष्टी समजावून सांगू शकतील. डॉक्टरसुद्धा सहजतेने उपचार करू शकतील. हृदय रुग्ण जर ते रक्तात गुठळ्या होऊ नये म्हणून काही गोळ्या घेत असतील तर त्याची माहिती त्याने दातांच्या डॉक्टरना सांगणे आवश्यक आहे. त्याने रुग्णाला काय औषध दिले पाहिजे ते ठरवणे शक्य होईल.

दातांवर आकस्मिक उपचार करताना ही काळजी घ्या

एखाद्या रुग्णाला अचानक दातांवर उपचार घेण्याची वेळ आली तर त्यांनी अशा रुग्णालयात उपचार घ्यायला हवे जिथे कॉर्डियाक मॉनिटरिंग उपलब्ध असेल. दातांच्या डॉक्टरांनी पण या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी की रुग्णाला काही गंभीर आजार तर नाही. मधुमेह आणि हृदय रुग्ण यांच्यावर सातत्यानी लक्ष ठेवायला हवे, जेणेकरून उपचार करताना कुठलीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. myUpchar.com च्या डॉ. वीके राजलक्ष्मी यांच्या अनुसार, दातांमुळे हिरड्याच्या समस्यादेखील निर्माण होतात. मधुमेही रुग्णांच्या बाबतीत ही परिस्थिती जास्त घातक होते.

या गोष्टींची घ्या काळजी

  • हृदय रुग्णांनी मौखिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. काहीही खाल्ल्यानंतर गुळण्या करण्याची सवय लावून घ्यायला हवी.
  • दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून दोनदा दात घासायला हवे त्यामुळे घाण शरीरात जाणार नाही.
  • संतुलित आहार घायला हवा आणि नियमित व्यायाम करायला हवा.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - हृदय रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 14, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading