प्री डायबेटिजही धोकादायक; वेळीच लक्षणं ओळखून प्रतिबंध करायचे उपाय जाणून घ्या

प्री डायबेटिजही धोकादायक; वेळीच लक्षणं ओळखून प्रतिबंध करायचे उपाय जाणून घ्या

आधीपासूनच हृदयरोग आहे त्यांच्यासाठी ही अवस्था अधिक धोकादायक आहे.

  • Last Updated: Aug 6, 2020 10:44 PM IST
  • Share this:

मधुमेह पूर्वस्थिती हृदयरोग आणि मृत्यूचा धोका वाढवते. ज्या लोकांना आधीपासूनच हृदय रोग आहे, त्यांच्यासाठी तर ही अवस्था अधिक धोकादायक आहे. मधुमेह होण्याआधीच्या स्थितीला मधुमेह पूर्वस्थिती किंवा प्री डायबेटिज असं म्हटलं जातं. त्याला सीमारेषेवरील किंवा बॉर्डरलाइन असेही म्हणतात. या अवस्थेत रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य स्तरापेक्षा जास्त असते. पण इतकंही जास्त नसते की त्याला मधुमेह म्हणू शकतो.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही यांनी सांगितलं, मधुमेहामध्ये रक्तातील साखर किंवा ग्लूकोजची पातळी वाढते. जेवण केल्याने शरीराला ग्लुकोज मिळते. इन्सुलिन या ग्लुकोजला शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवते जेणेकरून त्यांना ताकद मिळेल.

बीएमजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार असा अंदाज लावण्यात आला की, 2030 पर्यंत जगभरात 47 कोटी लोक प्री डायबेटिज या स्थितीत असतील आणि त्यातील 70 टक्के लोकांना टाइप 2 मधुमेह होईल. चीनच्या सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं आहे की, प्री डायबेटिज सर्वसामान्य आणि हृदय रोग असणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या मृत्यूचे कारण आहे.

हे वाचा - बेकिंग सोडा आणि व्हिनेगर; पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करणार मदत

संशोधकांनी प्री डायबेटिज आणि हृदय रोगाचा इतिहास असणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका किती आहे, याचा अभ्यास केला आणि संशोधनाच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं. त्यात एक कोटी लोकांचा अभ्यास केला. या विश्लेषणात असे दिसून आले की जवळपास 10 वर्षांच्या कालावधीतील सरासरी पहिली तर सामान्य जनसंख्येमध्ये मृत्यूच्या कारणांमध्ये प्री डायबेटीज हे कारण 13 टक्के होते. त्याचप्रमाणे या स्थितीमुळे 15 टक्के हृदय रोगी वाढले. कोरोनरी हृदय रोग आणि स्ट्रोक येण्याचा धोका सगळ्यात जास्त दिसून आला. हृदय रोग असणाऱ्या लोकांमध्ये प्री डायबेटीज या कारणामुळे 36 टक्के मृत्यू दर वाढला. त्याचप्रमाणे हृदय रोग होण्याची शक्यता 37 टक्के वाढली. संशोधकांनी असेही म्हटले आहे की, प्री डायबेटिजचे योग्य वेळी निदान आणि व्यवस्थापन केले तर या सगळ्या समस्यांना आपण थांबवण्यात योगदान देऊ शकतो.

हे वाचा - पावसाळ्यात गर्भवती महिलांनी 5 गोष्टींची घ्यावी काळजी

प्री डायबेटिजच्या काही लक्षणांकडे आपण बघायला हवे. वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी होणे, दिसायला त्रास होणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे आहेत. जेव्हा लोकांची दिनचर्या आरामदायी असते, गतिहीन असते तेव्हा प्री डायबेटिजचा धोका अधिक वाढतो. व्यायाम न करणे, कॉलेस्ट्रॉल वाढलेले असेल, झोप पूर्ण होत नसेल तर धोका आहे. जर पुरुषांची कंबर 40 इंच आणि महिलांची 35 इंच पेक्षा जास्त असेल तरीही प्री डायबेटिजची शक्यता वाढते.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, प्री डायबेटिजपासून वाचण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. एकाच वेळी जास्त खाऊ नका, थोड्या थोड्या वेळाने खा आणि कमी कमी खा. याने आपण प्री डायबेटिजपासून स्वतःला वाचवू शकतो. मधुमेहापासून दूर ठेवणारे घरगुती उपायदेखील केले जाऊ शकतात. सोबत धूम्रपान आणि दारू या व्यसनांपासून दूर राहायला हवे.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मधुमेह प्रकार, लक्षणे, कारणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 6, 2020, 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading