मुंबई, 16 फेब्रुवारी : चांगल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली आणि निरोगी खाण्याच्या सवयीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल आपल्यापैकी अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. आजच्या वेगवान जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणे हे प्रत्येकासाठी आव्हानात्मक काम आहे. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयीबद्दल बोलणार आहोत. काही सवयी तुम्ही स्वतःला वेळीच लावल्या तर दीर्घकाळ तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
निरोगी आणि संतुलित आहार घेणे
संतुलित आहारामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व प्रकारचे पोषक तत्व मिळतात. संतुलित आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे.
Prevent Hair Fall : केसगळतीचे मुख्य कारण असते चुकीचे पदार्थ खाणे, आजच आहारातून काढा हे पदार्थ
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायामामुळे वजन व्यवस्थापनात मदत होते आणि हाडे, स्नायू आणि सांधे यांचे आरोग्य सुधारते. शारीरिक कसरतदेखील उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करते. व्यायामाचा अर्थ नेहमी व्यायामशाळेत जाणे असा होत नाही. 30 मिनिटांच्या वेगाने चालण्याइतकी सोपी गोष्टदेखील तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि तुमचे आयुष्य वाढवू शकते. कामाच्या ठिकाणी पायऱ्या चढणे, जेवणाच्या वेळी 10-15 मिनिटे चालणे किंवा डेस्कवर थोडेसे पेडलिंग गॅझेट ठेवणे देखील फायदेशीर ठरू शकते.
नाश्ता घेणे कधीही टाळू नका
नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. हा तुमच्या दिवसातील सर्वात महत्वाचा आहार असतो. म्हणून ते कधीही वगळू नका. प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सने भरलेला निरोगी नाश्ता तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी पूर्ण आणि उत्साही ठेवेल. दिवसाच्या पहिल्या जेवणासाठी म्हणजेच नाश्त्यासाठी संपूर्ण धान्य आणि ब्रेड, कमी चरबीयुक्त दूध, अंडी, फळे आणि दही हे काही आरोग्यदायी पर्याय आहेत.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवासाठी पाणी आवश्यक आहे. म्हणून मेंदू आणि शरीराच्या निरोगी कार्यासाठी योग्य प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे. तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी किमान आठ ग्लास पाणी पिण्याची शिफारस केली जाते.
रोज किमान आठ तास झोपा
आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा मेंदू न्यूरोनल नेटवर्कची पुनर्बांधणी करतो जेणेकरुन आपण जागे झाल्यावर ते योग्यरित्या कार्य करू शकतील. दिवसातून किमान आठ तास झोप न घेतल्याने तंद्री, लक्ष विचलित होणे आणि विसरणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Walk केल्यानंतर ही योगासनं करा, पोट अन् श्वासासंबंधित आजारांपासून मिळेल सुटका
दातांची स्वच्छता
दंतचिकित्सकांनी दिवसातून दोनदा ब्रश करण्याची आणि दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी करण्याची शिफारस केली आहे. दातांची स्वच्छता सुधारण्यात फ्लॉसिंगदेखील महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांच्या मते, टूथ प्लाक तयार करणारे बॅक्टेरिया रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि दाह निर्माण करतात. म्हणून झोपण्यापूर्वी दात घासण्याचा सराव करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital prime time, Health, Health Tips, Lifestyle