बापरे! हे काय? 3 महिन्यांनी घराचं दार उघडताच महिलेला बसला शॉक

बापरे! हे काय? 3 महिन्यांनी घराचं दार उघडताच महिलेला बसला शॉक

महिलेला घरात धूळ किंवा कोळ्याचं घर नाही तर हे असं काहीतरी विचित्र दिसलं.

  • Share this:

पॅरिस, 03 जुलै : एखादं घर भरपूर दिवस बंद असेल तर त्या घरात धूळ आणि कोळ्याचं घर दिसेल मात्र फ्रान्समधील महिलेला मात्र जे दिसलं ते पाहून तिला शॉकच बसला. कोरोना लॉकडाऊनमुळे घर बंद करून गेलेली ही महिला 3 महिने घरी परतू शकली नाही. जेव्हा ती घरी परतली आणि घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिला समोर जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला

फ्रान्समधील या महिलेच्या घरावर दुसरं तिसरं कुणी नाही तर एका बटाट्याने कब्जा केला होता.

या महिलेनं एका दुकानातून बटाटे खरेदी केले होते, जे बॅगेत तसेच होते. नंतर कोरोना लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि मग ही महिला आपलं घर बंद करून दुसऱ्या शहरात आपल्या  मित्राच्या घरी राहायला गेली. जूनमध्ये ती आपल्या घरी परतली आणि घरातील परिस्थिती पाहून तिला धक्का बसला.

तिने जे बटाटे आणले होते, त्यांना कोंब फुटले आणि ते इतके वाढले की एखाद्या विचित्र आणि भयंकर प्राण्यासारखे दिसू लागले. हे कोंब भितींवर पसरले. फर्निचरमध्येदेखील घुसले. महिलेन या भयानक बटाट्याचा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सुरुवातील सर्वांनाच भीती वाटली.

संपादन - प्रिया लाड

First published: July 3, 2020, 10:47 PM IST
Tags: Viral

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading