मुंबई, 1 डिसेंबर : बटाटा हा फास्ट फूडमधील अविभाज्य घटक आहे आणि फास्ट फूड आजच्या तरुणाईचा जीव आहे.. पराठे, फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, बटाटा टिक्की, तळलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तरुणाईचा दिवस पूर्ण होत नाही. बरेच लोक रोजच्या नाष्ट्यातही बटाट्याचे पदार्थ खातात. पण जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते बटाटे खाणे टाळतात.
वजन कमी करण्याचा प्रवासात असलेले लोक बऱ्याचदा जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खातात. त्यामुळे त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही असे पदार्थ खायला हवे जे कमी प्रमाणात खाल्यानेही तुमचे पोट भरेल आणि ते खाल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. त्यामुळे बटाटा हा चांगला पर्याय ठरू शकतो.
Winter Health Tips : हिवाळ्यात चुकूनही एकत्र खाऊ नका हे पदार्थ, शरीराचे होईल मोठे नुकसान
झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बटाट्यामध्ये कार्ब्स आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते, पण ते खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि जास्त वेळ भूक लागत नाही. पोट लवकर भरल्यामुळे लोक त्या तुलनेत कमी अन्न खातात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. असे संशोधकांचे मत आहे. मात्र बटाटे खाऊन वजन कमी करण्यासाठी ते शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा बटाटे
- अमेरिकेतील लुईझियाना येथील पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरमधील आहारतज्ञ आणि या संशोधनाच्या सह-लेखिका प्रोफेसर कॅन्डिडा रेबेलो यांनी सांगितले, वजन कमी करण्यासाठी तुम्ही चिप्स किंवा तेलात तळलेले बटाटे खाणे टाळावे. कारण तळलेले असल्यामुळे त्याचे पोषण कमी होते आणि त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
- वजन कमी करण्यासाठी उकडलेले बटाटे खाणे फायदेशीर असल्याचे संशोधनात समोर आले आहे. उकडलेले बटाटे खाल्ल्यानंतर पोट जास्त काळ भरलेले राहते आणि त्यांना भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी असलेले जड पदार्थ खाणे चांगले. यामुळे कॅलरीज सहज कमी होऊ शकतात आणि वजन कमी होण्यास मदत होते, असेही संशोधकांनी सांगितले.
Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळणं होईल सोपं, फक्त खा हे पदार्थ
- बटाटे उकळवा आणि थंड करा. यामुळे बटाट्याचा GI म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि बटाटे आधी निरोगी, पौष्टिक बनतात. नंतर हे बटाटे 28 ग्रॅम पातळ केलेल्या पांढऱ्या व्हिनेगरमध्ये मिसळा जेणेकरून GI पातळी आणखी 30-40% कमी होईल. आपण व्हिनेगरऐवजी लिंबाचे काही थेंब देखील घालू शकतो. मात्र GI पातळी कमी करण्यासाठी व्हिनेगर अधिक प्रभावी आहे. यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips