1 सप्टेंबरपासून सुरू होणार 'ही' नवी बँक, मोफत सेवेसोबत मिळणार जास्त फायदा

1 सप्टेंबरपासून सुरू होणार 'ही' नवी बँक, मोफत सेवेसोबत मिळणार जास्त फायदा

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : सरकारने पोस्ट ऑफिसच्या पेमेंट बँकेची लाँचिंह डेट जाहीर केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB)ला पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 सप्टेंबरला लाँच करणार आहेत. याच दिवशी आयपीपीबी कंपीन आपले अॅप्लीकेशन देखील प्रदर्शीत करणार आहे. आयपीपीबी अॅप्लीकेशनच्या सहाय्याने, ग्राहक सुमारे 100 कंपन्यांच्या सेवांचा आनंद घेऊ शकतात. या सेवांमध्ये फोन रिचार्ज आणि बिल, वीज बिल, डीटीएच सेवा, कॉलेज फी इत्यादींचा समावेश आहे.

आयपीपीबी एकूण 650 शाखा सुरू करणार आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये 3,250 एक्‍सेस प्‍वॉइंट्स असतील आणि ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे 11,000 पोस्टमन कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा पुरविल्या जातील असे आयपीपीबीचे सीईओ सुरेश सेठी यांनी म्हटले आहे.

Shocking :नराधमाचा कुत्रीवर बलात्काराचा प्रयत्न,प्राईव्ह पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकून घेतला जीव

RTGS, NEFT, IMPS ट्रांजेक्‍शनसारख्या सेवा उपलब्ध होणार

आयपीपीबीला त्यांच्या खात्यातून सुमारे 17 दशलक्ष पोस्टल बचत बँक खाती जोडण्याची परवानगी आहे. आयपीपीबी बँक सुरू होण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, ग्रामीण भागातील लोकांना डिजीटल बँकिंग आणि वित्तीय सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. मोबाईल अॅप्लीकेशनच्या मदतीने किंवा पोस्ट ऑफिसमध्ये  जाऊन कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण सुलभ होईल.

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

लोक RTGS, NEFT, IMPS ट्रांजेक्‍शनसारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय सरकार पेमेंट्स बँकेचा वापर वेतन, सब्सिडी, पेंशनसारख्या सुविधांसाठीही होणार आहे.

देशातली तिसरी पेमेंट बँक

आयपीपीबी ही देशातील तिसरी पेमेंट बँक असणार आहे. यापूर्वी, एअरटेल आणि पेटीएम यांनी पेमेंट बँक सुरू केली आहे. पेमेंट्स बँक बचत खात्यामध्ये, कोणतीही व्यक्ती किंवा छोटे व्यापारी फक्त 1 लाखपर्यंत पैसे जमा करू शकतात.

 

संध्याकाळी सहा नंतर फोनच बंद करा, अमेझॉनच्या बॉसचा नवा आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 06:14 PM IST

ताज्या बातम्या