Home /News /lifestyle /

कोरोनातून लवकरात लवकर बरं व्हायचंय मग जिभेला आवर घाला; हे पदार्थ खाणं टाळाच

कोरोनातून लवकरात लवकर बरं व्हायचंय मग जिभेला आवर घाला; हे पदार्थ खाणं टाळाच

Post covid diet : कोरोनावर मात केल्यानंतर आहाराचीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

मुंबई, 24 जानेवारी : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. ओमिक्रॉन या नव्या प्रकारचा संसर्ग आता वाढत आहे. कोरोना संसर्ग (coronavirus Infection) झाल्यानंतर सर्वांत प्राथमिक लक्षण म्हणजे वास न येणं, चव न लागणं, अंगदुखी, ताप, प्रचंड थकवा येणं अशी आहेत. लक्षणं दिसल्यानंतर औषधे घेऊन सात-आठ दिवसात बरं वाटू शकतं. मात्र त्यानंतरही काही लोकांना थकवा, तोंडाला चव नसणं, भूक न लागणं अशी लक्षणं दिसत राहतात. काही लोकांना दहा दिवस तर काहींना दोन महिन्यांहून अधिक काळ देखील हा त्रास झाल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे. बरं वाटल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग संपल्याची खात्री करण्याकरता केलेल्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरदेखील काही लोकांना असा त्रास होत असल्याचं दिसतं. अशावेळी पुन्हा पहिल्यासारखे तंदुरुस्त होण्याकरता आपली जीवनशैली (Lifestyle) आणि आहार (Diet) यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे (Food to avoid after corona infection). काही गोष्टी विशेषत: खाद्यपदार्थ आवर्जून टाळण्याची गरज आहे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. तुम्हीदेखील कोरोना विषाणू संसर्गातून बरे झालेले असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या. हलका आहार घ्या : कोविड -19च्या (COVID-19)आजारातून बरे झाल्यानंतर काही महिने घरात शिजवलेलं अन्न खाणेच आवश्यक आहे. अर्थात घरी बनवलेलेच पदार्थ खाण्याचा अर्थ असा नाही की पराठे, सामोसे, कचोरी, भजी असे चमचमीत तेलकट पदार्थ बनवून खावेत. घरीदेखील पचनाला हलके, पौष्टिक पदार्थ (Light and Healthy Food) खाणं गरजेचं आहे. ताज्या आणि पचनाला जड नसलेल्या आहारामुळे पचन चांगले होते आणि ताकदही लवकर वाढते. हे वाचा - मुंबईला इतक्या वेगाने विळख्यात घेतोय Omicron; झोप उडवणारी आकडेवारी बाहेरचे पदार्थ खाऊ नका : बाहेरचे अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. कारण बाहेरच्या पदार्थात कोणते घटक वापरलेले असतात याची माहिती आपल्याला नसते, यातील काही घटक पदार्थ आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळं घरचं अन्न खाण्यालाच प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ वापरू नका : अनेक तयार खाद्यपदार्थांमध्ये वनस्पती तूप अन्य प्रिझर्व्हेटीव्हजचा वापर केलेला असतो. फ्रोजन पिझ्झा, सामोसा, कुकीज इत्यादी पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट (Trans Fat) प्रचंड प्रमाणात असतात. त्यामुळं अशा पदार्थांचे सेवन न करणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. पॅकेट फूड टाळा : आजकाल अनेक दीर्घकाळ टिकणारे प्रक्रिया केलेले (Processed Food) खाद्यपदार्थ मिळतात. असे पदार्थ पॅकेटस किंवा डब्यात असतात. मटार, कॉर्न, मांस असे विविध पदार्थ रासायनिक प्रक्रिया करून दीर्घकाळ टिकतील असे बनवले जातात. अशा फ्रोजन फूडचा वापर करणं टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे वाचा - Shocking! कोरोना लस घेताच वाढली महिलेची ब्रेस्ट साईझ; डॉक्टर म्हणाले... कुकीज, केक, चॉकोलेट टाळा : कुकीज (cookies), केक (Cake), चॉकोलेट, शीतपेये म्हणजेच कार्बोनेटेड ड्रिंक्स , प्रक्रिया केलेले पदार्थ, ज्यूस असे पदार्थ तर बंद करावेत. या पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर असते, तसंच काही पदार्थांमध्ये गोडवा आणणारे कृत्रिम घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळं अशा पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळलं पाहिजे.
First published:

Tags: Coronavirus, Food, Health, Lifestyle

पुढील बातम्या