कमी झोप आरोग्यासाठी धोक्याची घंटा, 'या' गंभीर आजाराला मिळतंय आमंत्रण

कमी झोप आरोग्यासाठी धोक्याची घंटा, 'या' गंभीर आजाराला मिळतंय आमंत्रण

झोप (sleep) न येणं म्हणजे निद्रानाश हा एक आजार आहे. यामुळे तणाव, डोकेदुखी, थकवा वाढतोच शिवाय इतर आजारांनाही निमंत्रण मिळतं. हृदयासंबंधी आजार (heart disease), स्ट्रोकचा (stroke) धोका वाढू शकतो.

  • Share this:

न्यूयॉर्क, 08 मार्च : कामाचा ताण, थकवा यामुळे काही वेळा झोप (sleep) लागत नाही, मात्र जर झोप न येणं ही तुमची रोजचीच सवय झाली असेल, तर मात्र चिंतेचं कारण आहे. कमी झोप ही तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. झोप न येणं म्हणजे निद्रानाश हा एक आजार आहे. यामुळे तणाव, डोकेदुखी, थकवा वाढतोच शिवाय इतर आजारांनाही निमंत्रण मिळतं. झोप न लागल्यास हृदयासंबंधी आजार, स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

कोलंबिया युनिव्हर्सिटी वागेलॉसच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हे वाचा - तुम्ही स्मोक करत नसाल तरीही तुमचं आरोग्य धोक्यात, वाचा काय आहे नेमकं कारण

संशोधकांनी महिलांची झोप आणि त्यांच्या आहाराचा अभ्यास केला. 20 ते 76 वयोगटातील 495 महिलांचा या अभ्यासात समावेश होता.

ज्या महिलांची झोप पूर्ण होत नाही, त्या जास्त कॅलरी आणि कमी पौष्टिक अशा पदार्थांच जास्त सेवन करतात.

ज्यांची झोप चांगली नाही, त्या महिलांना हृदयरोग बळावण्याचा आणि वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.

हे वाचा - डायबेटिज आणि हृदयाच्या समस्यांना दूर ठेवेल हा ज्युस, संशोधकांचा दावा

संशोधक ब्रुक अग्रवाल यांनी सांगितलं, महिलांवर कुटुंब आणि मुलांची जबाबदारी असते, कुटुंबाला सांभाळता सांभाळता त्यांना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे त्यांना झोपेटी समस्या बळावते. शिवाय रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समध्ये बदल होतात आणि त्यामुळेदेखील महिलांच्या झोपेची गुणवत्ता बिघडते.

त्यामुळे हृदयाच्या आजारांना दूर ठेवायचं असेल तर पुरेशी झोप महत्त्वाची आहे.

First published: March 8, 2020, 8:02 PM IST

ताज्या बातम्या