मुंबई, 3 जुलै : आरोग्यासाठी जितकं महत्त्वाचं अन्न, पाणी आहे तितकंच महत्त्वाचं आहे शरीराला आराम देणं. दिवसभर धावपळ केल्याने शरीर दमतं आणि त्याला पुरेसा आराम मिळणं गरजेचं असतं. तरुणांचं दिवसभर कॉलेज, ऑफिस, घर हे रुटीन चालू असतं आणि त्यानंतर रात्रीची शांत झोप तुमचा दिवसभराचा ताण दूर करते. पण रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर? सतत काम आणि तणाव असणाऱ्या तरुणांनी पुरेशी झोप न घेतल्यास त्यांना आरोग्याशी निगडीत अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये सर्वाधिक धोका आहे तो नैराश्याचा. यासंबंधी करण्यात आलेल्या एका अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्धवट झोपेमुळे तरुणांमध्ये नैराश्य, आत्महत्येचा किंवा स्वचःला त्रास करून घेण्याचा विचार यांचं प्रमाण वाढते. असा विचार मनात येणं किंवा त्यांचं प्रमाण वाढणे हे धोकादायक आहे.
हार्ट अटॅकने जाणार होता जीव! Apple Watch ने असा वाचला जीव, पाहा VIDEO
स्लिप रिसर्च सोसायटीच्या ‘स्लिप’ या जर्नलमध्ये याविषयी अधिक माहिती दिली आहे. अर्धवट झोपेचा थेट संबंध आहे तो मानसिक आरोग्याशी. परिणामी तरुणांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचा विचार येण्यास सुरुवात होते. या अभ्यासात जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यापैकी 8,462 विद्यार्थी खेळाडू होते.
अमेरिकेतल्या अरिझोना युनिव्हर्सिटीतील लेखिका थे रामसे यांनी असं मत व्यक्त केलं की, “तरुणांमधील झोपेच्या अभावामुळे मानसिक आरोग्याशी निगडीत अनेक गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढत आहे आणि ही बाब अतिशय धक्कादायक आहे.”
योगासनं केल्याने 'या' गंभीर समस्या होतील दूर
अपूर्ण झोपेची शरीराला सवय लागते आणि अशा तरुणांचं दिवसेंदिवस मानसिक आरोग्य खालावतं. दिवसागणिक हे प्रमाण 20टक्क्यांनी वाढतं. एवढंच नाही तर याचा परिणाम संपूर्ण मनावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे नैराश्यात 21 टक्क्यांनी अधिक वाढ होते. तर निराशा, राग आणि नकारात्मकता यांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ होते. सततची काळजी आणि स्वतःला त्रास करून घेण्याच्या विचारामध्ये 25 टक्के आणि आत्महत्येसारख्या गंभीर विचारात 28 टक्क्यांनी वाढ होते.
झोपेचा थेट संबंध मानसिक आरोग्य आणि आजारांशी आहे. कारण, विद्यार्थी जितक्या प्रमाणात अभ्यास, काम आणि शारीरिक कष्ट घेतात तितकीच आवश्यक विश्रांती त्यांना मिळत नाही किंबहुना ते घेत नाहीत, असं मत विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल ग्रॅंडर यांनी व्यक्त केलं.
मेस्सी आणि रोनाल्डोलाही 'टफ फाईट' फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा VIDEO व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा