• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Shocking! गुदद्वारातून शू, पेनिसमधून शी; तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधील बिघाड पाहून डॉक्टरही हैराण

Shocking! गुदद्वारातून शू, पेनिसमधून शी; तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधील बिघाड पाहून डॉक्टरही हैराण

गेल्या दोन वर्षांपासून तरुण प्रायव्हेट पार्टसंबंधी या विचित्र समस्येचा सामना करतो आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर : माणसाच्या शरीराची एक ठरलेली रचना असते. पुरुष असो वा महिला, लहान मूल असो वा वयस्कर व्यक्ती, तरुण असो वा प्रौढ... सर्व माणसांमध्ये एखादा विशिष्ट अवयव विशिष्ट ठिकाणी असतो आणि त्या अवयवाचं कार्य समान असतं. पण एका तरुणाच्या बाबतीत मात्र उलटंच घडलं. त्याच्या प्रायव्हेट पार्टचं (Private part) कार्यच बदललं (Private part problem). म्हणजे गुद्द्वार जिथून शौच केलं जातं, तिथून ही व्यक्ती लघवी करू लागली (Man Passes Urine From Rectum). तर पेनिस जिथून लघवी होते, तिथून या व्यक्तीची पॉटी निघू लागली (Potty From Penis). अमेरिकेच्या टेक्सासमधील (Texas) 33 वर्षीय व्यक्ती आपली ही विचित्र समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेली. तिची ही समस्या पाहून डॉक्टरही (Weird Medical Problems) हैराण झाले. गेल्या दोन वर्षांपासून ही व्यक्ती या समस्येचा सामना करत आहे. पण याबाबत कुणासोबत तो बोलू शकला नाही, त्याला लाज वाटायची. दोन वर्षांनंतर त्याची अवस्था भयंकर झाली. त्याच्या टेस्टिकल्समध्ये सूज आली आणि असह्य तीव्र वेदना होऊ लागल्या. तेव्हा त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. हे वाचा - बापरे! आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक चाखलं तरी जाऊ शकतो जीव; तरुणीला विचित्र आजार डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, एका वैद्यकीय चुकीमुळे या व्यक्तीच्या प्रायव्हेटर पार्टमध्ये गडबड झाली होती.  माहितीनुसार दोन वर्षांपूर्वीच ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे ही व्यक्ती तीन आठवडे कोमात होती. त्यावेळी त्याच्या शरीरातील मलमूत्र काढण्यासाठी फॉले कॅथिटर लावण्यात आलं होतं. यातून कोमातील रुग्णाच्या शरीरातील लघवी आणि शौच काढलं जातं. यामुळे या व्यक्तीच्या शरीराला हानी पोहोचली होती. तेव्हापासून तो पुढून शौच आणि मागून लघवी करत होता. दोन वर्षांनी त्याची समस्या अधिकच वाढली तेव्हा युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मेडिकल ब्रांचने त्याचा अभ्यास केला. दोन वर्षे त्याचा शरीरारातील या उलट प्रक्रियेचा त्याच्यावर गंभीर दुष्परिणाम झाला होता. त्याचे टेस्टिकल्स सूडले होते. शरीरात गॅस तयार झाल्याने युरिन आणि सीमन त्याच्या रेक्टममध्ये जमा होऊ लागले होते. यामुळे त्याचे स्पर्म मागच्या बाजूने निघत होते.  शरीराचं कार्य बिघडल्याने त्याच्या शरीरात इन्फेक्शन झालं होतं. हे वाचा - आईने बाळाला टॉवेलऐवजी बँडेजमध्येच गुंडाळून ठेवलं; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी सिटी स्कॅनमध्ये त्याच्या शरीरातील गडबडीचं निदान झालं. त्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. आता त्याची प्रकृती ठिक आहे. लवकरच तो सर्वसामान्य आयुष्य जगेल अशी आशा डॉक्टरांना आहे.
  Published by:Priya Lad
  First published: