Home /News /lifestyle /

15 ते 30 मिनिटांत कमी होते ब्लड शुगर; डायबेटिज औषधापेक्षा कमी नाही हा ज्युस

15 ते 30 मिनिटांत कमी होते ब्लड शुगर; डायबेटिज औषधापेक्षा कमी नाही हा ज्युस

रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्यास हा ज्युस अत्यंत गुणकारी ठरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

मुंबई, 07 ऑक्टोबर : मधुमेही (Diabetes) रुग्णांना रक्तातली (Blood) साखर नियंत्रणात (Blood Sugar Level) ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. योग्य आहार, व्यायाम आणि औषधं यांच्या मदतीने रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. आहारातला बदल यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. काही निवडक फळं, भाज्या, अन्नपदार्थ यांतले काही घटक साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यात एक फळ आहे ज्याचा ज्युस (Juice for control Blood Sugar) रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्यास अत्यंत गुणकारी ठरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे फळ आहे डाळिंब (Pomegranate). डाळिंबाचा एक छोटा ग्लास ज्युस (Pomegranate juice) रक्तातल्या साखरेचं वाढलेलं प्रमाण 15 मिनिटांत कमी करत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. यासाठी त्यांनी एक संशोधन केलं, त्यात हा निष्कर्ष समोर आला आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींचे दोन गट केले. त्यातल्या एका गटाला साखर असलेलं सरबत दिलं, तर एका गटाला डाळिंबाचा ज्युस दिला. डाळिंबाचा ज्युस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरात साखरेची पातळी 15 ते 30 मिनिटांत कमी झाल्याचं आढळून आलं. त्यांना साधारण 230 मिली ज्युस देण्यात आला होता. त्यावरून डाळिंबाचा ज्युस रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे वाचा - फक्त सुगंधी मसालाच म्हणूनच नव्हे तर, वेलचीचे आरोग्यासाठी आहेत इतके सारे फायदे डाळिंबामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स (Antioxidents) आढळतात. त्यात ग्रीन टी आणि रेड वाइनमधल्या अँटीऑक्सिडंट्सच्या जवळजवळ तीनपट अँटीऑक्सिडंट्स डाळिंबामध्ये असतात. हे अँटीऑक्सिडंट्स मधुमेह किंवा फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या आजारांशी लढतात. डाळिंबाच्या बिया इन्शुलिन पातळी सुधारतात. त्याचा फायदा मधुमेही रुग्णांना होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याशिवाय डाळिंबामध्ये कार्बोहायड्रेट्सचं (Carbohydrates) प्रमाण खूप कमी असतं. 100 ग्रॅम डाळिंबामध्ये फक्त 19 ग्रॅम कार्ब्स असतात. कार्बोहायड्रेट्सचं चयापचय (Metabolism) वेगाने झाल्यानं रक्तातल्या साखरेची पातळी लगेच वाढते. म्हणूनच मधुमेहींना कमी कार्बयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाचा ग्लायसेमिक लोड (जीएल) अंदाजे 18 आहे. त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी योग्य राखण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतं. रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी केल्यानं टाइप-2 मधुमेह (Type-2 Diabetes) असलेल्यांना हृदयविकार, स्ट्रोक, किडनी फेल्युअर, डोळ्यांचे विकार या आजारांचा धोका कमी करता येतो, असं ब्रिटनमधले वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार एस्थर वोल्ड्न यांनी म्हटलं आहे. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचे इतर उपाय रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस जसा उपयुक्त ठरतो, तसंच अन्य काही उपायही उपयुक्त ठरत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. ऑप्टिबॅक प्रोबायॉटिक्समधले पोषणतज्ज्ञ कॅरी बीसन यांच्या मते, नियमित चालण्यामुळेदेखील (Walking) रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. चालण्यामुळे हृदयाची गती वाढते, त्यामुळे आपल्या शरीराच्या सर्व भागांत रक्त पोहोचतं. दररोज 15 ते 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे. ताणताणाव असल्यानेदेखील रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तणाव दूर (Stress Relief) करणारे व्यायाम करणंही महत्त्वाचं असतं. तुम्ही चालण्याचा व्यायाम करत नसाल, तर तणाव दूर करणारे योगासनांसारखे व्यायाम उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे शरीरातली पाण्याची पातळी (Water Level) योग्य राखणंदेखील महत्त्वाचं असतं. दररोज किमान दोन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. हे वाचा - तुमच्या नखांकडे एकदा नीट पाहा, त्यांचा बदलेला रंग दर्शवतो या रोगांची लक्षणं त्याचबरोबर आपल्या आहारातलं साखरेचं प्रमाण कमी करणंदेखील आवश्यक आहे. साखरेचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाण्याने रक्तातल्या साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे कार्बयुक्त (Carbs) पदार्थांचं सेवन कमी करणं गरजेचं आहे. साखरयुक्त पेय, पांढरा भात किंवा पांढरा ब्रेड यांसारख्या गोष्टी खाणं टाळणं आवश्यक आहे.
First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle, Tips for diabetes

पुढील बातम्या