Home /News /lifestyle /

Pomegranate Benefits: दररोज 1 डाळिंब खाण्याचे आहेत इतके सगळे फायदे; निरोगी आयुष्याचं गुपित

Pomegranate Benefits: दररोज 1 डाळिंब खाण्याचे आहेत इतके सगळे फायदे; निरोगी आयुष्याचं गुपित

Pomegranate Benefits : डाळिंबामध्ये इतर फळांपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात. यासोबतच त्यात C, E, K ही जीवनसत्त्वे असतात. डाळिंबाचे दाणे थेट खाण्याबरोबरच त्याचा रस काढून प्यायल्यानेही शरीराला खूप फायदा होतो.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर : डाळिंब हे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण फळ मानले जाते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्त तर वाढतेच पण त्यामुळे शरीराला इतरही अनेक फायदे होतात. यामध्ये इतर फळांपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात. यासोबतच त्यात C, E, K ही जीवनसत्त्वे असतात. डाळिंबाचे दाणे थेट खाण्याबरोबरच त्याचा रस काढून प्यायल्यानेही शरीराला खूप फायदा होतो. डाळिंब हे सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयोगी फळ आहे. डाळिंबामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते. 'मेडिकल न्यूज टुडे'च्या बातमीनुसार, डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराला गंभीर आजार होण्याचा (Pomegranate Benefits) धोकाही कमी होतो. डाळिंब खाण्याचे 10 फायदे जाणून घ्या 1. अँटिऑक्सिडंट्स - डाळिंबात असलेल्या पॉलिफेनॉलमुळे, त्याच्या दाण्यांचा रंग लालसर असतो. ही रसायने अतिशय शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहेत. यामुळेच डाळिंबात इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे जळजळ कमी होते तसेच पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. 2. व्हिटॅमिन सी - डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपल्या दैनंदिन गरजेपैकी ४० टक्के व्हिटॅमिन सी डाळिंबात असते. याच्या सेवनाने शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते. 3 पचन - डाळिंब खाल्ल्याने आतड्यांमुळे होणाऱ्या जळजळीत आराम मिळतो आणि आपली पचनक्रिया सुधारते. ज्यांना पोटात जळजळ किंवा अल्सरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी डाळिंब खाणे खूप फायदेशीर आहे. 4. अँटी-इंफ्लेमेटरी – डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात कारण त्यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात. शरीरात होणारी जळजळ कमी करण्यात मदत होते. डाळिंब खाण्यामुळे शरीरावरील स्ट्रेस कमी होतो. 5. संधिवात - ज्यांना संधिवाताची त्रास आहे त्यांनी डाळिंब खावे. सांधेदुखीमुळे होणारी अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. ऑस्टियोपोरोसिस, संधिवात आणि इतर प्रकारच्या संधिवाताव्यतिरिक्त, डाळिंबाचा रस देखील सांध्यांच्या जळजळीत आराम देतो. 6. हृदयरोग – हृदयविकार टाळण्यासाठी डाळिंबाचा रस पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या सेवनाने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तवाहिन्यांना घट्ट होण्यापासून बचाव होतो. डाळिंब खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल तयार होण्याचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्याचा वेगही मंदावतो. हे वाचा - घरामध्ये या गोष्टींचा करा धूर, कोरोना विषाणूही राहील दूर; AYUSH मंत्रालयाने दिली ही माहिती 7. रक्तदाब - उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी डाळिंब खाणे किंवा त्याचा रस पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. 8. स्मरणशक्ती - आजकाल तरुणांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कमकुवत स्मरणशक्ती. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने आपली नवीन गोष्टी शिकण्याची स्मरणशक्ती सुधारते. 9. मधुमेह - आपल्या देशात डाळिंबाचा वापर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घकाळापासून केला जातो. त्याच्या मदतीने इन्सुलिन निर्मितीचा वेग वाढण्यास मदत होऊ शकते. हे वाचा - Soup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत 10. व्हिटॅमिन - आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे किती महत्त्वाची आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त, डाळिंबात फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के देखील असते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या