मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पुणे तिथे काय उणे! स्ट्रेस दूर करण्यासाठी पुण्यातल्या पोलिसांनी शोधला भन्नाट उपाय

पुणे तिथे काय उणे! स्ट्रेस दूर करण्यासाठी पुण्यातल्या पोलिसांनी शोधला भन्नाट उपाय

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं कामही वाढलंय, तसंच त्यांच्यावरचा ताणही कित्येक पटींनी वाढलाय. तोच कमी करण्यासाठी म्युझिक थेरपीची मदत घेण्यात आलीय.

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं कामही वाढलंय, तसंच त्यांच्यावरचा ताणही कित्येक पटींनी वाढलाय. तोच कमी करण्यासाठी म्युझिक थेरपीची मदत घेण्यात आलीय.

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं कामही वाढलंय, तसंच त्यांच्यावरचा ताणही कित्येक पटींनी वाढलाय. तोच कमी करण्यासाठी म्युझिक थेरपीची मदत घेण्यात आलीय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 9 फेब्रुवारी : पोलीस स्टेशनमध्ये ‘म्युझिक रूम’ असू शकते? कोणी कल्पनाही करणार नाही, अशी गोष्ट पुण्यातल्या छावणी भागातल्या पोलीस ठाण्यात घडली आहे. पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी इथल्या पोलीस ठाण्यात एक म्युझिक रूम तयार करण्यात आलीय. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं कामही वाढलंय, तसंच त्यांच्यावरचा ताणही कित्येक पटींनी वाढलाय. तोच कमी करण्यासाठी म्युझिक थेरपीची मदत घेण्यात आलीय. दिवसभराचं काम आटोपून अनेक कर्मचारी व अधिकारी तिथं येऊन गाण्याचा आनंद लुटतात. 'नवभारत टाइम्स'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    पुण्याच्या छावणी भागातल्या पोलीस ठाण्यात एक उत्तम म्युझिक रूम तयार करण्यात आलीय. अशा प्रकारे म्युझिक रूम तयार करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलंच व कदाचित एकमेव पोलीस ठाणं असेल. दिवसभरातला स्ट्रेस कमी करण्यासाठी काम संपवून कर्मचारी इथं येऊन गाणी म्हणतात व ताण कमी करतात. ही म्युझिक रूम अलीकडेच तयार करण्यात आलीय.

    Panic Vs Anxiety Attack : पॅनिक आणि एन्गझायटी अटॅकची लक्षणं दिसतात सारखीच, असा ओळखा फरक

    “कोरोनाची महामारी कमी झाल्यावर कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी काही करावं यासाठी डॉ. संतोष बोराडे यांच्या मदतीनं म्युझिक थेरपी सेशनचं आयोजन केलं होतं. त्यांच्याच सल्ल्यानं एक माइक आणि स्पीकर बसवला,” असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितलं. पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या मानसिक शांततेची गरज होती, असंही ते म्हणाले.

    पोलीस ठाण्यात माइक आणि स्पीकर लावल्यावर अनेक कर्मचारी गाणी म्हणू लागले. तेव्हा कराओके सिस्टीम, सिंगिंग माइक आणि मिक्सरही घ्यावा अशी कल्पना सुचली. एका स्थानिक गुरुद्वाराच्या मदतीनं तेही घेण्यात आलं. आता पोलीस अधिकारी आणि हवालदार असे एकूण 15 जण नियमित या रूममध्ये येऊन गाणी म्हणतात. या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

    ताण कमी झाल्यामुळे कर्मचारी आणखी चांगलं काम करू लागले आहेत, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना वाटतं. जास्तीचं काम दिलं तरी कर्मचारी विनातक्रार ते करतात व आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचा कर्मचाऱ्यांचा संवादही वाढला आहे असंही त्यांनी सांगितलं. कर्मचारी या म्युझिक रूममध्ये येऊन मोहम्मद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार अशा प्रसिद्ध गायकांची गाणी म्हणतात.

    नोकरीमुळे गाण्याच्या आवडीकडे दुर्लक्ष झालेले उपनिरीक्षक विनायक गुर्जर यांचं म्हणणं आहे, की ते आता ड्युटीनंतर दररोज त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा अभ्यास करतात. कधी कधी स्थानिक संगीतप्रेमीही त्यांच्यासोबत गाणी म्हणतात. ‘अशा प्रकारे गाणी म्हणणं हे मनाला शांतता देतं,’ असं पोलीस हेड कॉन्स्टेबल रहिशा शेख यांनी सांगितलं. दिवसभराचं काम संपवून त्या रोज गाण्याचा अभ्यास करतात.

    कोलेस्टेरॉल वाढल्यास दिसत नाहीत लक्षणं! फक्त या पद्धतीनेच ओळखू शकता

    संगीतामुळे मन शांत होतं. त्यामुळेच संगीताचा वापर करून पोलिसांवरचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न लष्कर परिसरातल्या पोलीस ठाण्यानं केला आहे.

    (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle