जयपूर, 21 मार्च : हातात मोबाईल आणि त्यात इंटरनेट म्हटल्यावर आपण काही ना काही सर्च करतच असतो. बरेच फोटो, व्हिडीओ पाहत असतो. पण आता तुम्ही इंटरनेटवर काय पाहत आहात यावर पोलिसांचा वॉच असणार आहे. तुम्ही जर नको ते कन्टेंट इंटरनेटवर सर्च करत असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर पोलीस तुमच्या घरी धाड ठाकून तुम्हाला बेड्या ठोकतील आणि तुरुंगातही डांबतील
(Police watch on objectionable content search on internet).
अश्लील फोटो आणि व्हिडीओ सर्चिंगला आळा घालण्यासाठी आता राजस्थान पोलील अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. पोलिसांनी कठोर पाऊल उचललं आहे. पोलीस मुख्यालयात विशेष पथकही तयार करण्यात आलं आहे. यासाठी खास सायबर डोम सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये तुमच्या IP एड्रेसवरून वारंवार काय सर्च केलं जातं आहे, हे पोलिसांना समजणार.
सर्वात आधी असे आयपी अॅड्रेस ट्रेस केले जातील ज्यावर वारंवार अश्लील कंन्टेट सर्च केले जात आहेत, डाऊनलोड केले जात आहेत. अशा नंबरची माहिती मिळवली जाईल आणि त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोलीस पोहोचतील. हा नंबर इंटरनेटचा वापर कोण करतं याची विचारणा केली जाईल. कुटुंबाच्या सदस्यांसमोरच त्या व्यक्तीची पोलखोल होईल. त्याला एकदा समज दिली जाईल आणि तरी असं घडलं तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.
हे वाचा - बॉयफ्रेंडसमोर लाज वाटायची म्हणून वारंवार रोखली फार्ट; गायिकेची झाली भयंकर अवस्था
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार DGP एमएल लाठर यांनी एका रिसर्चचा हवाला देत सांगितलं की, गेल्या दोन वर्षांत इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. दरदिवशी एक व्यक्ती 6 तास 36 मिनिटं इंटरनेटवर वेळ घालवते. गुगल सर्चमध्ये जे टॉप 20 की-वर्ड्स आहेत ते अश्लील कन्टेन्ट सर्चशी संबंधित आहेत. ही खूप मोठी समस्या आहे. यावर नियंत्रण मिळवलं नाही तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल. लहान मुलांशी संबंधित कन्टेन्टला प्राथमिकता दिली जाईल. कारण रिसर्चनुसार असे कन्टेन्ट डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि ते मोठ्या प्रमाणत व्हायरल केले जात आहेत.
हे वाचा - बॉयफ्रेंडसमोर लाज वाटायची म्हणून वारंवार रोखली फार्ट; गायिकेची झाली भयंकर अवस्था
याबाबत संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला माहिती दिली जाईल. तरीसुद्धा पुन्हा अशी चूक झाली तर सायबर अॅक्टअंतर्गत एफआयआर दाखल केली जाईल, असं लाठर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.