दोन बायका फजिती ऐका; नवऱ्याची केली आपसांत वाटणी पण...

दोन बायका फजिती ऐका; नवऱ्याची केली आपसांत वाटणी पण...

दोन बायका फजिती ऐका : एका पतीला त्याच्या दोन पत्नींमध्ये रीतसर वाटलं गेलं. पण काही फार दिवस सुरळीत सुरू राहिलं नाही. त्या नवऱ्याच्या त्याच्या या फाजील कामाचा आता चांगला धडा मिळत आहे.

  • Share this:

रांची, 16 फेब्रुवारी : वैवाहिक संबंधामध्ये अनेक प्रकारचे गुंते निर्माण होताना आपण पाहतो. हे गुंते अनेकदा जोडपी आपापल्या पद्धतीनं सोडवतही असतात. दोन बायका केलेल्या नवऱ्याची गोष्ट (husband has been shared between 2 wives).अनेकदा सिनेमात, नाटकांत, साहित्यातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पण प्रत्यक्षात असं नातं असतं तेव्हा काय होतं? रांचीमध्ये सध्या एक चित्रविचित्र घटना या दिवसात समोर आली आहे. एका पतीला त्याच्या दोन पत्नींमध्ये रीतसर वाटलं गेलं आहे.

या प्रकरणात पती आठवड्यात तीन दिवस एका पत्नीसह आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहणार होता. हा तरुण उरलेला एक दिवस त्याला हवा तसा त्याच्या इच्छेनुसार घालवू शकेल अशी त्याला परवानगी मिळाली. अर्थात हे सगळं खूप काळ सुरळीत चालू शकलं नाही.

या प्रकरणात सांगितलं जातं आहे, की हा युवक आधीपासूनच विवाहित (married) होता. त्यानं विवाहित असतानाच दुसऱ्या एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवत तिच्याशी लग्न केलं. पोलिसांना या प्रकरणाची खबर लागताच त्यांना तिघांमध्ये सामंजस्यानं प्रकरण सोडवण्याव्यतिरिक्त कुठला मार्ग दिसला नाही. पोलिसांनी दोन पत्नींमध्ये या व्यक्तीची वाटणी केली.

पोलिसांनी वाटणी केली तरी हे असं जास्त दिवस काही चालू शकलं नाही. हे प्रकरण लवकरच कोर्टात गेलं. आता न्यायालयानं या व्यक्तीविरोधात वॉरंटच (warrant) काढलं आहे. या व्यक्तीच्या दोन्ही बायका आता त्याला वाचवण्यात गुंतल्या आहेत. हे प्रकरण रांचीच्या कोकर तिरील रोडचं आहे. इथं राहणाऱ्या राजेश महतो याला पोलिसांनी 15 जानेवारी 2020 रोजी ताब्यात घेतलं. पोलिसांनी निर्णय घेतला, की आता या व्यक्तीला आपल्या दोन पत्नींसोबतच राहावं लागेल.

प्रकरण कोर्टात पोचल्यावर मात्र त्याला वेगळंच वळण मिळालं. राजेश महतो याच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्याविरुद्ध लग्नाच्या बहाण्यानं लैंगिक छळ (sexual harassment) केल्याचा आरोप लावला होता. याकारणानेच प्रकरण कोर्टात (court) पोचलं. कोर्टानं कडक भूमिका घेत महतोच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलं. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या मुलीची online फसवणूक करणारे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांचं म्हणणं आहे, की राजेश महतो पहिली पत्नी आणि मुलाला सोडून गर्लफ्रेंडसोबत (girlfriend) राहायला निघून गेला होता. त्याच्या पत्नीनं याबाबत तक्रार दिली होती. सोबतच गर्लफ्रेंडच्या कुटुंबानंही महतोच्या विरुद्ध आपल्या मुलीचं अपहरण केल्याची केस केली. राजेश महतो जास्त दिवस पोलिसांपासून पळ काढू शकला नाही. पोलिसांनी त्याला शोधून काढलं. मात्र तोवर राजेशनं आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं होतं.

पोलीस राजेशला घेऊन पोलीस ठाण्यात पोचले तेव्हा दोन्ही बायकांमध्ये भांडण सुरू झालं होतं. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य समजून घेत हा मार्ग काढला होता.

Published by: News18 Desk
First published: February 16, 2021, 6:45 PM IST

ताज्या बातम्या