अतिशहाणपणा नडला! मोठ्या स्टारसारखे डोळे बनवण्याच्या नादात आंधळी झाली मॉडेल

अतिशहाणपणा नडला! मोठ्या स्टारसारखे डोळे बनवण्याच्या नादात आंधळी झाली मॉडेल

आपल्या या छोट्याशा चुकीची किंमत अशी मोजावी लागेल याची कल्पनाही या मॉडेलने (poland model) केली नसावी.

  • Share this:

वारसॉ, 01 ऑक्टोबर : एखाद्या अभिनेत्रीसारखे आपले डोळे, केस, ओठ असावेत, अभिनेत्यासारखा हेअरकट असावा असं प्रत्येकाला वाटतं. त्याच नादात कित्येक जण त्या सेलिब्रिटीप्रमाणे आपलं रूप बदलून घेतात आणि असात नाद भारी पडला आहे तो पोलंडमधील एका मॉडेलला (poland model). एका रॅपरसारखे डोळे हवेत म्हणून तिनं आयबॉल टॅटू (eyeball tattoo) करून घेतला आणि ती आंधळी झाली आहे.

मॉडेल अलेक्झेंड्रा सडोवस्काला रॅपर पोपकसारखं दिसायचं होतं. त्यासाठी तिनं आपले डोळे पूर्ण काळे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिनं डोळ्यांमध्ये टॅटू करून घेतला. पण टॅटू डिझाइनरची एक चूक तिला चांगलीच महागात पडली. ज्याची कल्पनाही केली नसेल असा दुष्परिणाम झाला.

डोळ्यांमध्ये टॅटू करणं ज्याला आयबॉल टॅटू किंवा स्क्लेरल टॅटू म्हणूनदेखील ओळखलं जातं. यामध्ये डोळ्यांच्या बुब्बुळांमध्ये शाई इंजेक्ट केली जाते. त्यामुळे डोळ्यांचा पांढरा भाग काळा दिसू लागतो. अलेक्झेंड्राने पिओटर ए पायोत्र या टॅटू डिझायरकडून डोळ्यांमध्ये टॅटू करून घेतला. तिच्या डोळ्यातही काळी शाई इंजेक्ट केली. त्यानंतर तिच्या डोळ्यात वेदना होऊ लागल्या. या वेदना सामान्य आहे आणि पेनकिलर्सनी बंद होतील, असं टॅटू डिझायनरने तिला सांगितलं.

हे वाचा - 'जॉबकी खुशी तूम क्या जानो...'भररस्त्यात तरुणी लागली नाचायला, पाहा मजेशीर VIDEO

पण आता तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली आहे. फॅशनच्या नादात टॅटू डिझायनरच्या चुकीची इतकी मोठी किंमत मोजावी लागेल याची कल्पनाही तिने केली नसेल. त्या डिझायनरने अशा शाईचा वापर केला होता जी डोळ्यांसाठी नव्हती. शिवाय टॅटू डिझायनरकडे या नाजूक प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशिक्षणही घेतलं नव्हतं, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जातो आहे.

हे वाचा - Teddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा

डेली मेलच्या रिपोर्टनुसार तिला आपल्या डोळ्यांची दृष्टी परत मिळवण्यासाठी तीन प्रक्रिया कराव्या लागल्या. पण शाई तिच्या डोळ्यांतील ऊतींपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे तिच्या डोळ्यांची दृष्टी परत येण्याची आशा नाही आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: October 1, 2020, 8:28 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या