मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Poha v/s Murmure : पोहे की मुरमुरे, आरोग्यासाठी काय आहे उत्तम? दोन्हींमध्ये नेमका फरक काय?

Poha v/s Murmure : पोहे की मुरमुरे, आरोग्यासाठी काय आहे उत्तम? दोन्हींमध्ये नेमका फरक काय?

पोह्यांचे कांदे पोहे आणि मुरमुर्यांचे लाडू सर्वानाच आवडतात. मात्र या दोन्हींपैकी नेमके काय जास्त पोषक आणि आरोग्यासाठी चांगले आहे. याबद्दल आज पण माहिती घेणार आहोत.

  मुंबई, 10 ऑगस्ट : भारतीय जेवणामध्ये या ना त्या प्रकारे तांदूळ वापरला जातोच त्याशिवाय आपला आहार पूर्ण होतच नाही. मात्र अनेकजण असेही आहेत ज्यांना वाटते की, जास्त भात खाल्ल्याने ते जाड होतील. म्हणून असे लोक तांदुळापेक्षा पोहे किंवा मुरमुऱ्यांना जास्त प्राधान्य देतात. पोह्यांचे कांदे पोहे आणि मुरमुर्यांचे लाडू सर्वानाच आवडतात. मात्र या दोन्हींपैकी नेमके काय जास्त पोषक आणि आरोग्यासाठी चांगले आहे. याबद्दल आज पण माहिती घेणार आहोत. कॅलरी काउंट पोहे आणि मुरमुऱ्यांच्या कॅलरीत खूप फरक आहे. 100 ग्रॅम तांदळात सुमारे 130 कॅलरीज असतात, तर 100 ग्रॅम मुरमुऱ्यामध्ये सुमारे 402 कॅलरीज असतात आणि 100 ग्रॅम पोह्यात अंदाजे 110 कॅलरीज असतात. हे पदार्थ बनवण्याची पद्धतीवरदेखील कॅलरीची संख्या अवलंबून असते. मात्र कॅलरीजचा विचार केला तर पोहे हे मुरमुऱ्यांपेक्षा अधिक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. Vrat Recipe : सोमवारच्या उपवासासाठी बनवा मखाना बर्फी, गोड खाऊनही वाढणार नाही वजन पोहे आणि मुरमुरे बनण्याची प्रक्रिया पोहे आणि मुरमुरे दोन्ही तांदळापासून बनवले जातात. पण यांची बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तांदूळ उकळून, लाटून, सपाट करून आणि उन्हात वाळवून पोहे तयार करतात. तर मुरमुरे तांदूळ धुवून, उकळवून आणि पूर्णपणे वाळवून तयार केले जातात. तांदळाचे दाणे नंतर गरम मीठाने भरलेल्या भांड्यात ढवळले जातात. यावरूनदेखील दोन्हींचे आरोग्य फायदे बदलतात.

  Sweet Recipe : रक्षाबंधनाला बनवा ही झटपट होणारी मिठाई, भावासोबतचे क्षण होतील आणखी गोड

  वजन कमी करणे वजन कमी करण्यासाठी तुम्ही भात खाणे टाळात असाल. तर मुरमुरे आणि पोहे तुमच्यासाठी चांगले पर्याय आहेत. मुरमुऱ्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मात्र पोहे त्यापेक्षाही जास्त फायदेशीर मानले जातात कारण यामध्ये कॅलरीची संख्या खूपच कमी असते. तसेच पोह्यांमधे फायबर आणि प्रोटीनदेखील मिथ्या प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पोहे उत्तम पर्याय आहे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या