नरेंद्र मोदींच्या Man Vs Wild नंतर 'या' पानांच्या शोधासाठी Google वर पाऊस... काय आहे हे sweet neem?

नरेंद्र मोदींच्या Man Vs Wild नंतर 'या' पानांच्या शोधासाठी Google वर पाऊस... काय आहे हे sweet neem?

पंतप्रधान मोदी आणि बेअर ग्रिल्स यांनी काही काळासाठी Google Search वर हजारो लोकांना sweet neem चा शोध घेण्यास भाग पाडलं. काय आहे हे प्रकरण?

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : पंतप्रधान मोदी आणि बेअर ग्रिल्स यांनी काही काळासाठी Google Search वर हजारो लोकांना sweet neem चा शोध घेण्यास भाग पाडलं. या औषधी वनस्पतीचा उल्लेख या दोघांचा सहभाग असलेल्या Discovery चॅनेलवरच्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात आला आणि मोदींनी या झाडाची पानं घातलेला चहाही प्यायला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी pm narendra modi प्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रिल्स Bear Grylls बरोबर घनदाट जंगलात घालवलेल्या क्षणांवर आधारित Man Vs Wild या सीरिजचा नवा एपिसोड सोमवारी रात्री discovery चॅनेलवर दाखवण्यात आला. यामध्ये मोदी आणि बेअर ग्रिल्स उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये कोअर भागात फिरत असताना दिसले. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांबरोबर नव्या साहसी मोहिमेवर निघालो असल्याचं बेअर ग्रिल्सने जाहीर केलं होतं, तेव्हापासून या कार्यक्रमाविषयी उत्सुकता होती.

कलम 370 संदर्भात हस्तक्षेप करण्यास SCचा नकार; कोर्ट म्हणाले, सरकारला वेळ द्या!

या मोहिमेत मोदी आणि बेअर ग्रिल्स एका छोट्या तराफ्यातून नदी पार करून येतात. गडगडाटी पाऊस आणि थंड पाणी अशा वातावरणात भिजत दोघं थर्मासमधला 'चहा' घेताना दिसले.

स्वीट नीम आणि चहा

ग्रिल्सने पंतप्रधानांना हा स्वीट नीम घातलेला चहा देऊ केला. तेव्हा Sweet Neem म्हणत हसत हसत मोदींनी ही पानं भारताच्या घराघरात दिसतील. आमच्या स्वयंपाकाचा हा अविभाज्य भाग आहे, असं बेअर ग्रिल्सला सांगितलं. त्यानंतर हजारो दर्शकांनी Sweet Need शोधण्यासाठी Google ची मदत घेतल्याचं स्पष्ट होतंय.

स्वीट नीम म्हणजेच आपला कढीपत्ता. Curry leaves नावानेही ही पानं इंग्रजीत ओळखली जातात. कढीनिंब किंवा कढीपत्ता बहुतेक सर्व भारतीय घरांमध्ये आमटी, भाजी, वरण, डाळ यामध्ये आवर्जून वापरला जातो. यामध्ये अनेक औषधी गुण असतात.

मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी या पानांचा उपयोग होतो.

गरिबीतलं बालपण ते पहिल्या सुट्टीपर्यंत PM मोदींनी सांगितल्या 'या' गोष्टी

कॅन्सरवरसुद्धा ही पानं गुणकारी असल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे. यासंदर्भातला लेख द गार्डियनने प्रसिद्ध केला होता.

अनेकांना स्वीट नीम म्हणजेच करी लीव्ह्ज हे माहीत नव्हतं.

अनेकांना रोजच्या वापरातला कढिपत्ता असा गरम पाण्यात उकळून पितात हे नवं होतं. अनेकांना कढिपत्त्याचे औषधी गुणधर्म माहीत नव्हते. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण डिस्कव्हरी चॅनेलवर सोमवारी रात्री 9 ते 10 दरम्यान झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत गुगलवर स्वीट लाईम शोधलं गेलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर याविषयी चर्चा रंगली.

कोण आहे बेअर ग्रिल्स

बेअर ग्रिल्सचं खरं नाव एडवर्ड मायकेल ग्रिल्स Edward Michael Grylls असं आहे. पण त्याच्या साहसी स्वभावामुळे त्याला बेअर ग्रिल्स Bear Grylls असं नाव मिळालं. ग्रिल्सने अत्तापर्यंत Man Vs Wild कार्यक्रमात अनेक अचाट प्रकार केले आहेत. अनेक साहसी अनुभव त्याने दाखवले आहेत. डिस्कव्हरी चॅनेलवरचा त्याचा हा शो खूप लोकप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जिम कॉर्बेट पार्कमध्ये ऐन जंगलात पायपीट केल्याने या एपिसोडविषयी भारतीयांनाही खूप उत्सुकता होती. जगातल्या 180 देशांमध्ये हा कार्यक्रम दाखवला गेला.

---------------------------------

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 13, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading