कोरोना काळात उपयुक्त असा फुलाचा चहा; नियमित प्यायल्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

कोरोना काळात उपयुक्त असा फुलाचा चहा; नियमित प्यायल्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मसाला टाकून चहा पित असाल मात्र या फुलाचा चहा पिणंही तितकंच फायदेशीर आहे.

  • Last Updated: Oct 26, 2020 08:37 PM IST
  • Share this:

कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवणं महत्त्वाचं आहे. यासाठी आहारवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. चहा (Tea) बनवतानादेखील आपण त्यात दालचिनी, वेलची, आलं अशा पदार्थांचा वापर करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का फक्त असे मसालेच नाही तर फुलाचा चहादेखील तुम्ही बनवू शकता आणि त्यामुळेदेखील तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे फूल म्हणजे जाईचं फूलं, ज्याला जॅस्मिन असं म्हटलं जातं.

जाईचं फूल सुगंधी असतं. त्यामध्ये इतर चहाप्रमाणेच उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि सामान्य सर्दी आणि शीतज्वरापासून बचाव करण्यात मदत करतात. myupchar.com च्या डॉ. आकांक्षा मिश्रा यांनी सांगितलं, चांगली रोगप्रतिकारक शक्ती अधिक गंभीर रोग आणि संक्रमणांशी लढू शकते आणि यासाठी आरोग्य राखणं महत्वाचे आहे. जाईच्या चहामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते. एक कप जाईचा चहा प्यायल्याने पोटातील त्रासही कमी होतात.

जाईच्या झाडाचे आणि फुलाचे याशिवाय बरेच फायदे आहेत. ते कोणते पाहुयात.

चिंता दूर होते.

myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, जाईच्या फुलाचा किंवा त्याच्या तेलाचा सुगंध मनावर सुखदायक प्रभाव टाकतो.   की जाईची लागवड केल्यास ताणतणाव दूर होण्यास मदत होते.या वनस्पतीच्या सुगंधाने चिंता आणि ताण तणाव कमी होण्यास मदत होते.  त्याचबरोबर जाई अँटिसेप्टिक आणि जंतूनाशक देखील आहे.

शांत झोप लागते

झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची असते. जर झोपेची कमतरता असेल तर संपूर्ण दिनक्रम बिघडत जाईल, भावनांवर नियंत्रण ठेवण्यात, समस्यांचे निराकरण करण्यात आणि आव्हानांशी लढण्यात अडचण येते. जर तुम्हाला परिपूर्ण झोप हवी असेल तर घरी जाईचं झाड लावा. त्याचा सुगंध केवळ इंद्रियांना मोहित करणारा नाही तर रात्रीच्या झोपेसाठी देखील मदत करतो.

हवा शुद्ध ठेवतं

जाईचं झाड नैसर्गिकरित्त्या हवा शुद्धीकरण करतात. विशेषत: जेव्हा ते घरामध्ये असतात तेव्हा ते फार उपयुक्त ठरतात. त्यांचा सुखदायक गंध घरातील हवा शुद्ध करतो.

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

जाईची फुलं केसांसाठीही फायदेशीर आहे. 20-25 फुले घ्या आणि त्यांना पाण्यात उकळून या पाण्याने केस धुवा.  कोरडे आणि कुरळे केस असतील तर जाईच्या तेलाचे काही थेंब अर्गॉन तेलामध्ये मिसळावं आणि केसांना लावावं.

जंतुनाशक गुणधर्मांनी समृद्ध

जाईमध्ये बेंझिल बेंझोएट, बेंझोइक अॅसिड आणि बेंझालहाइड हे तिन्ही जंतूनाशक आहेत. किरकोळ जखमा आणि कापल्यामुळे होणाऱ्या जखमांना या तेलाच्या वापराने त्वरित आराम मिळेल.

वजन कमी होतं

चहामध्ये जाईची फुलं मिसळल्याने वजन नियंत्रणास मदत होते. चहाच्या पानांसह पाण्यात काही फुलं उकळा आणि दिवसातून तीन वेळा प्या यामुळे चयापचय प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - टीपा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 26, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या