मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Air Pollution सर्वात जास्त कोण करतं कार की विमान? कोणता पर्याय चांगला?

Air Pollution सर्वात जास्त कोण करतं कार की विमान? कोणता पर्याय चांगला?

सध्या भारतात वायू प्रदूषणाचा (Air Pollution) मुद्दा ऐरणीवर आला आहे. बऱ्याच काळापासून असे मानले जात आहे की कारपेक्षा (Cars) विमाने (Aeroplanes) जास्त प्रदूषण करतात. मात्र, खरेच असे आहे का? आकडे काय सांगतात? चला जाणून घेऊया.

सध्या भारतात वायू प्रदूषणाचा (Air Pollution) मुद्दा ऐरणीवर आला आहे. बऱ्याच काळापासून असे मानले जात आहे की कारपेक्षा (Cars) विमाने (Aeroplanes) जास्त प्रदूषण करतात. मात्र, खरेच असे आहे का? आकडे काय सांगतात? चला जाणून घेऊया.

सध्या भारतात वायू प्रदूषणाचा (Air Pollution) मुद्दा ऐरणीवर आला आहे. बऱ्याच काळापासून असे मानले जात आहे की कारपेक्षा (Cars) विमाने (Aeroplanes) जास्त प्रदूषण करतात. मात्र, खरेच असे आहे का? आकडे काय सांगतात? चला जाणून घेऊया.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 18 नोव्हेंबर : सध्या दिल्लीसह उत्तर भारतात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याची अनेक कारणं आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण यातील महत्वाचं कारण, मानलं जातं. जगातील बहुतेक जीवाश्म इंधने (Fossil Fuel) फक्त वाहतुकीसाठी वापरली जातात. त्यावरील अवलंबित्व दूर करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जीवाश्म इंधन अजूनही विमान वाहतूक आणि रस्ते वाहतुकीमध्ये महत्वाचे आहे. अनेक काळापासून हरितगृह वायूंच्या (Greenhouse Gases) उत्सर्जनात विमाने देखील एक प्रमुख घटक मानली जात आहेत. वेळेसोबत रेल्वे गाड्या, बस आणि अगदी कारमध्ये इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. विमाने अजूनही सर्वाधिक उत्सर्जन करत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नवीन डेटा आवश्यक आहे. चला जाणून घेऊया.

दोघांची तुलना करणे सोपे नाही

हरितगृह वायू उत्सर्जनाच्या संदर्भात कार आणि विमाने यांच्यात थेट तुलना करणे अवघड आहे. यासाठी दोन्हींचा प्रति किलोमीटर इंधनाचा वापर जाणून घ्यावा लागेल. यानंतर त्याला विशिष्ट उत्सर्जन घटकांनी गुणावे लागेल. जे इंधनाच्या प्रकारावर अवलंबून असते. याशिवाय इतर अनेक घटकांचा समावेश करावा लागेल. पण ते आकडेही प्रति प्रवासी आधारावर बदलावे लागतील.

अनेक गोष्टी गृहीत धराव्या लागणार

समस्या अशी आहे की अशा प्रकारचे मूल्यांकन करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास केला? वाहनाचे मॉडेल समान दर्जाचे असू शकत नाही, प्रवाशांची संख्या व्यापक असू शकत नाही. तरीही, युरोपियन पर्यावरण एजन्सीच्या अहवालाने काही प्रदूषण आकडे प्रसिद्ध केले, ज्याची गणना प्रत्येक प्रवासी प्रति किलोमीटर CO2 उत्सर्जनाच्या युनिटमध्ये केली गेली. ट्रेनचे 14 ग्रॅम, लहान कार 42, सरासरी कारचे 55, बसचे 68, दुचाकीचे 72 आणि विमानाचे 285 ग्रॅम इतके आहे.

Air pollution वर जपानी उपाय आजमावणार भारत? प्रदूषणापासून मिळू शकते मुक्ती

आकडे काही वेगळचे सांगतायेत

अशा परिस्थितीत कारपेक्षा विमाने अधिक प्रदूषण करतात असं म्हणता येईल का? तसं पहाताना वाटतं की विमाने अधिक प्रदूषण पसरवत आहेत. परंतु, ही आकडेवारी पूर्णपणे योग्य चित्र दाखवत नाही. कारचा विचार केला तर कारमध्ये चार लोक बसतात, पण, असं प्रत्येकवेळी असेलच असं नाही. दुसरीकडे विमानामध्ये सरासरी 88 प्रवासी संख्या असते. तर अनेक देशांमध्ये सरासरी यापेक्षा खूप जास्त आहे. एका कारमधील चार प्रवाशांसाठी असलेला 55 ग्रॅम आकडा 220 ग्रॅम होईल, तर सरासरी 115 प्रवाश्यांमुळे या आकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होईल.

हे आकडे अचूक नाहीत

हे स्पष्ट आहे की इतर अभ्यासात आकडे वेगळे असतील. म्हणजेच, EEA ची आकडेवारी पूर्णपणे अचूक चित्र स्पष्ट करत नाही. या डेटाची उपयुक्तता यापुढे प्रभावी राहणार नाही. कारण, कार ते विमानापर्यंत प्रचंड तांत्रिक बदल झाले आहेत, विमानातील नवीन तंत्रज्ञानामुळे इंधन कार्यक्षमता वाढली आहे. शिवाय, EEA आकडे जसे आहेत तसे घेण्याची आवश्यकता नाही, जरी ते अनेक वेळा थेट वापरले गेले आहेत.

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

कार आणि विमान एकाच लेव्हलवर?

काही अलीकडील अभ्यास असेही सुचवित आहेत की आता कार आणि विमाने प्रदूषणाच्या बाबतीत एका पातळीवर आले आहेत. बऱ्याच बाबतीत कार विमानांपेक्षा पुढे आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन ट्रान्सपोर्टेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, कार वाहतुकीची सरासरी ऊर्जा हवाई वाहतुकीच्या तुलनेत 57 टक्के जास्त आहे.

लांब अंतरासाठी विमान चांगले

इंटरनॅशनल कौन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशन (ICCT) नुसार, लांबच्या प्रवासात सरासरी दोन लोक असलेली कार दोन लोकांच्या उड्डाणापेक्षा किंचित जास्त CO2 उत्सर्जित करते. तर 3 लोकांची कार त्यांच्या फ्लाइटपेक्षा 15 टक्के कमी उत्सर्जन करते. परंतु, हे फक्त लांब पल्ल्यांसाठीच खरे आहे, तरीही, प्रत्येक फ्लाइटसाठी कार हा पर्याय नाही.

Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम; इतकं आयुष्य घटण्याची भीती

तरीही सुट्टीसाठी गाडीने जाण्यापेक्षा विमानाने जाणे चांगले. जॅम आणि एसीच्या वापरामुळे कार अधिक इंधन वापरतात. याचा अर्थ विमान वायू प्रदूषण कमी करतात असे नाही. ते आजही मोठे प्रदूषण करणारे आहेत. आज जागतिक CO2 उत्सर्जनामध्ये विमानचालनाचा वाटा सुमारे 2-3 टक्के आहे, परंतु रस्ते वाहतुकीचा वाटा 10 टक्के आहे.

First published: