पावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच!

पावसळ्यात फिरायला जाण्यासाठी ही आहेत भारतातील काही सर्वोत्तम ठिकाणं.

  • Share this:

अलेप्पी, केरळः मान्सूनमध्ये खऱ्या अर्थाने निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं असल्यास केरळातलं अलेप्पी हे ठिकाण अप्रतिम आहे. अलेप्पीचं वातावरण पर्यटकांना प्रदूषणमुक्त आणि हिरव्यागार निसर्गाचा अनुभव देतं. पर्यटक क्रुझवरचा आनंदही येथे घेऊ शकतात. (फोटो- रफा राज)

उदयपूर, राजस्थानः भारतातल्या अद्भुतरम्य जागांपैकी एक आहे राजस्थानमधलं उदयपूर. पावसाळ्यात फिरण्यासाठी ते अत्यंत सुंदर ठिकाण आहे. कारण, तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे. तिथल्या अनेक जागांपैकी पिचोला सरोवर आणि फतेह सागर सरोवर पर्यटकांनी पाहण्याजोगे आहेत.

चेरापुंजी, मेघालयः जगात सर्वात जास्त पाऊस पडण्यामध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या चेरापुंजीमध्ये जाण्याचा अनुभव सुखकर आहे. त्यातच पावसाळ्यात तिथे जाण्याची मजा वेगळीच आहे. जंगलं, झाडे आणि शेती यांनी समृद्ध असलेल्या ही जागा पावसाळ्यात आणी सुंदर होते. (फोटो – दुलमोनी दास)

चेरापुंजी, मेघालय : जगात सर्वात जास्त पाऊस पडण्यामध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या चेरापुंजीमध्ये जाण्याचा अनुभव सुखकर आहे. त्यातच पावसाळ्यात तिथे जाण्याची मजा वेगळीच आहे. जंगलं, झाडे आणि शेती यांनी समृद्ध असलेल्या ही जागा पावसाळ्यात आणी सुंदर होते. (फोटो – दुलमोनी दास)

मुन्नार, केरळ : जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर ही जागा तुमच्यासाठी नक्कीच स्वर्ग ठरेल. डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे शहर पावसाळ्यात जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात ही जागा धुक्याची चादर ओढते आणि तुम्हाला मनःशांती हवी असल्यास इथे अवश्य भेट द्या.

महाबळेश्वर, महाराष्ट्र : महाराष्ट्रातलं हे थंड हवेचं ठिकाण पावसाळ्यात जाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पर्यटकांनी ही जागा नेहमीच भरलेली असते. तिथे असणाऱ्या वेण्णा सरोवर, मॅप्रो गार्डन, प्रतापगड आणि लिंगमळा धबधबा पाहण्याजोगी ठिकाणं आहेत. वीकएंडला छोट्या पिकनिकसाठी हा एक चांगला पर्याय आहे. (फोटो – श्वेता)

माउंट अबू, राजस्थान : राजस्थानसारख्या कोरड्या राज्यामध्ये माउंट अबू हे एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरने परिपूर्ण असलेलं हे ठिकाण हनिमून आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे. (फोटो – अभिषेक वाडनेकर)

लोणावळा, महाराष्ट्र : महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जागांपैकी एक लोणावळा आहे. लोणावळा थंड हवेचं ठिकाण असल्यासोबतच ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि साइटसीईंगसाठी उत्तम ठिकाण आहे. मुंबईपासून 83.1 किमी आणि पुण्यापासून 66.4 किमी अंतरावर असणारी ही जागा विकेंडसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो – भाग्येश अरसुल)

वायनाड,केरळ : पिक्चर परफेक्ट असलेल्या या ठिकाणावर 3 दिवसांचा 'Splash' हा मान्सून फेस्टिवल आयोजित केला जातो. इथल्या रम्य वातावरणासोबतच ट्रेक आणि कॅम्पिंगचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. (फोटो – मेहफुज)

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड : पश्चिम आणि पूर्व हिमालयाच्या पर्वतरांगांच्या कुशीत असलेलं ही जागा पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. 400 पेक्षा अधिक फुलांच्या प्रजातींचं सौंदर्य पाहण्याचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता. (फोटो – रश्मी)

कूर्ग, कर्नाटकः बॅंगलोरपासून By road 270 किमी. वर असणारं कूर्ग पावसाळ्यात फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. कॉफीच्या मळ्यांनी भरपूर असलेलं हे ठिकाण त्याच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. जर, तुम्ही साहसी असाल तर ताडियंदामोल या शिखराच्या टोकावर ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. (फोटो – बिमल राठ)

कूर्ग, कर्नाटकः बॅंगलोरपासून By road 270 किमी. वर असणारं कूर्ग पावसाळ्यात फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. कॉफीच्या मळ्यांनी भरपूर असलेलं हे ठिकाण त्याच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. जर, तुम्ही साहसी असाल तर ताडियंदामोल या शिखराच्या टोकावर ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. (फोटो – बिमल राठी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या