शरीराच्या या भागांवर बर्फ ठेवल्यास काही क्षणात दूर होतं दुखणं!

शरीराच्या या भागांवर बर्फ ठेवल्यास काही क्षणात दूर होतं दुखणं!

अॅक्युप्रेशरचा वापर करून चीनमध्ये अनेक आजारांवर उपचार केले जातात. बर्फाच्या वापराच्या उपयोगाचा शोधही त्यांनीच लावला असल्याचं म्हटलं जातं. याला आइस क्यूब ट्रीक असं नाव देण्यात आलं आहे.

  • Share this:

हवामानात थोडासा जरी बदल झाला तर त्याचे परिणाम लगेच शरीरावर जाणवू लागतात. अशात शरीरातील अनेक अवयव कमालिचे दुखू लागतात. अनेकांना हवामानातील बदलामुळे डोके दुखी किंवा मायग्रेनसारखे आजार होतात. अनेकांना कंंबरदुखीचा त्रास होतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर काहीजण उपचार घेतात. पण या सर्व गोष्टी घरगुती उपायांनीही दूर करता येतील. आज आम्ही तुम्हाला बर्फाच्या वापराने अंगदुखी कशी थांबवता येईल याबद्दल सांगणार आहोत.

अॅक्युप्रेशर- चीनमध्ये असं मानलं जातं की, शरीरात असे अनेक पॉइंट असतात जे दाबल्यावर दुखणं बंद होतो. अॅक्युप्रेशरचा वापर करून चीनमध्ये अनेक आजारांवर उपचार केले जातात. बर्फाच्या वापराच्या उपयोगाचा शोधही त्यांनीच लावला असल्याचं म्हटलं जातं. याला आइस क्यूब ट्रीक असं नाव देण्यात आलं आहे. ही ट्रीक वापरणं अतिशय सोप्पं आहे.

दुखण्यापासून मिळतो आराम- बर्फाचा तुकडा मानेच्या मागच्या बाजूला कमीत कमी 20 मिनिटं ठेवा. हळू हळू बर्फ वितळू लागेल. या पॉइंटला चीनमध्ये फेंग फू असं म्हणतात. बर्फ ठेवण्याच्या 40 सेकंदांनंतर मान थंड होत असल्याची जाणीव होईल. यानंतर मानदुखीपासून आराम मिळायला सुरुवात होईल. या पद्धतीचा वापर करून तुम्हाला फक्त दुखण्यापासूनच आराम मिळतो असं नाही तर छान झोपही लागते.

बर्फामुळे स्नायूंना मिळतो आराम- बर्फ तुम्ही कंबरेवरही ठेवू शकता. कंबरेच्या वरील भागावर बर्फ ठेवल्याने त्याच्या थंडाव्यापासून शरीराच्या खालील भागातील अवयवांना आराम मिळतो. जर तुमचे पाय, कंबर किंवा पार्श्वभाग (Hip) दुखत असतील तर त्यांना त्वरीत आराम मिळेल. बर्फाच्या थंडाव्यामुळे स्नायूंना तर आराम मिळतोच शिवाय रक्ताभिसरणही नियमित होतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Vastushastra: घराच्या मुख्य दरवाजाकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर व्हाल कंगाल!

पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

विमानातून प्रवास करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

Published by: Madhura Nerurkar
First published: September 11, 2019, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading