चहाप्रेमींनो, जरा हे पाहा... 'असा' चहा प्यायलात तर होऊ शकतो कॅन्सर

नुकत्याच एका रिसर्चमधून असं पुढे आलंय की, अतिगरम चहा प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो. नेमका काय आहे हा रिसर्च?

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 09:05 PM IST

चहाप्रेमींनो, जरा हे पाहा... 'असा' चहा प्यायलात तर होऊ शकतो कॅन्सर

गरमागरम चहा कुणाला आवडत नाही? पण तो किती गरम प्यायचा याला काही मर्यादा आहेत.

कारण नुकत्याच एका रिसर्चमधून असं पुढे आलंय की, उकळता चहा पिणाऱ्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

दारू आणि सिगारेटमुळे कॅन्सर होतो, हे तर सगळ्यांना माहीत आहे. त्यात आता भर चहाची पडली आहे. असंही म्हटलं जातंय की दारू, सिगरेट ओढणाऱ्यांनी गरम चहा प्यायला तर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

चीनच्या नॅचरल सायन्स फाऊंडेशननं आपल्या रिसर्चमध्ये हे सांगितलंय. त्यांनी दोन ग्रुप तयार केले. एक ग्रुप कोमट चहा आणि 15 ग्रॅम दारूचं सेवन करायचा. तर दुसरा ग्रुप गरम चहा आणि 15 ग्रॅम दारू घ्यायचा. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता बळावली.

अन्ननलिकेचा कॅन्सर घातक असतो. त्यातून वाचण्याची शक्यता कमी असते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ अॅडव्हान्स मेडिकल अँड हेल्थ रिसर्चच्या म्हणण्याप्रमाणे भारतात अन्ननलिकेच्या कॅन्सरनं मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

Loading...

त्यामुळे चहा प्यायला काहीच हरकत नाही, पण तो उकळता न पिण्याची काळजी घ्यायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...