Home /News /lifestyle /

जेवणाला चव देणारं सैंधव मीठ ब्युटी प्रोडक्टपेक्षा कमी नाही; सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा वापर

जेवणाला चव देणारं सैंधव मीठ ब्युटी प्रोडक्टपेक्षा कमी नाही; सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा वापर

तुम्हाला माहित आहे का? हे सैंधव मीठ (Pink Salt Benefits) साधारण मिठापेक्षा आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे आपण रोजच्या जेवणातही या मिठाचा वापर करू शकतो. याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला मिळू शकतात.

    मुंबई, 24 जून : आपल्याकडे मिठाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी पांढरे मीठ, काळे मीठ, आणि सैंधव मीठ हे साधारणपणे सर्वानाच माहिती आहेत. उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण सहसा सैंधव मीठ (Pink Salt Benefits) वापरतो. मात्र तुम्हाला माहित आहे का? हे सैंधव मीठ साधारण मिठापेक्षा आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे आपण रोजच्या जेवणातही या मिठाचा वापर करू शकतो. याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला मिळू शकतात. सैंधव मिठाला (Sendha Mith) हिमालयीन सॉल्ट (Himalayan Salt), रॉक सॉल्ट (Rock Salt), लाहोरी सॉल्ट (Lahori Salt) किंवा पिंक सॉल्ट अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या मीठात सामान्य मिठाच्या तुलनेत आयोडीनचे प्रमाण कमी असते. तर हे कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक यांसारख्या गुणधर्मांनी समृद्ध असते. हे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. या मिठामध्ये 90 हून अधिक मिनरल्स असतात. आज आम्ही तुम्हाला सैंधव मिठाचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत. ब्लडप्रेशरसाठी फायदेशीर तुम्ही पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर केल्यास ते ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी (Pink Salt For Blood Pressure) खूप उपयुक्त ठरते. यासोबतच हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. याच्या वापरामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते. Aloe Vera oil: केस राहतील हेल्दी आणि शायनी; घरच्या-घरी असं बनवा केमिकल फ्री एलोवेरा ऑइल सायनसपासून आराम सायनसच्या आजारात सैंधव मीठ खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही सायनसच्या समस्येने त्रस्त असाल (Pink Salt For Sinus) तर तुमच्या जेवणात सामान्य मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करा. तुमची सायनसची समस्या दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर सिद्ध होईल. अनेक श्‍वसनाच्या आजारांवरदेखील हे फायदेशीर आहे. फेस स्क्रबिंगसाठी आपल्या चेहऱ्यावर अनेकदा प्रदूषणामुळे धूळ व घाण साचते अशावेळी आपल्याला चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्याची गरज असते. सैंधव मीठ स्क्रबर (Pink Salt Face Scrub) म्हणूनही वापरता येऊ शकते. यामुळे चेहऱ्याची छिद्रे उघडतात. यासाठी खोबरेल तेलात थोडे सैंधव मीठ घालून चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. हे उत्तम स्क्रबचे काम करते. निद्रानाशापासून सुटका तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहारात सैंधव मीठ म्हणजेच पिंक सॉल्टचा (Pink Salt For Insomnia) वापर करून या समस्येवर मात करू शकता. यासाठी मधासोबत या मिठाचे सेवन करावे. असे केल्याने तुम्हाला गाढ झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश वाटेल. Hand Washing: हॅडवॉश करताना 90 टक्के मुलं या चुका करतात; आजारी पडण्याचं प्रमाण म्हणून वाढतं वजन कमी करणे प्राचीन आयुर्वेदात असे सांगितले आहे की सैंधव मीठ आपल्या शरीरातील चरबी (Pink Salt To Loose Weight) काढून टाकते. एवढेच नाही तर शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Beauty tips, Food, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या