Home /News /lifestyle /

थंडीमुळे पायाला भेगा पडल्यात; Cracked heels क्रीम सोडा आता एकदा अननस वापरून कमाल पाहा

थंडीमुळे पायाला भेगा पडल्यात; Cracked heels क्रीम सोडा आता एकदा अननस वापरून कमाल पाहा

Pineapple For Skin Care : अनेक वर्षांपासून हे फळ विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरलं जात आहे. केस आणि त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी अननस खूप फायदेशीर आहे.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर : अननस (Pineapple) हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. अनेक वर्षांपासून हे फळ विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरलं जात आहे. ते केस आणि त्वचेसाठी (Pineapple For Skin Care) चांगलं असतं. यात  ब्रोमेलेन नावाचं एन्झाइम अननसात आढळतं, ते त्वचेला तजेलदार बनवतं आणि त्वचेची चमक वाढवतं.  त्याचा वापर करून फुटलेल्या टाचांच्या समस्येवरही मात करता येते. अननसामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, पोटॅशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. अननसाचा रस रोज सेवन केल्यास किंवा अननसाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची चमक वाढते. याशिवाय, अननस त्वचेच्या खोलवर परिणाम करतं. त्यामुळं त्वचेवरील मळ आणि मृत त्वचा निघून जाते. तुम्हाला त्याचा स्क्रबर म्हणून वापर करायचा असेल तर प्रथम एका भांड्यात अननसाचा लगदा काढून त्यात दोन चमचे ब्राऊन शुगर मिसळा. आता हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. 10 मिनिटांनंतर धुवा. तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. हे वाचा - Health Tips : Vitamin B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल तुमच्या पायांना पडलेल्या भेगा ठीक करायच्या असतील तर अननसात साखर मिसळून पेस्ट बनवा आणि भेगांवर आणि पायाला लावून चांगलं स्क्रब करा. तुम्ही त्यात थोडा मधही घालू शकता. त्यानंतर कोमट पाण्यानं पाय धुवा. अशा प्रकारे, आपण आपल्या पायांच्या टाचांना भेगा होण्यापासून वाचवू शकतो. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का? जर तुमची नखे पिवळट आणि कमकुवत झाली असतील तर अंड्याचा पांढरा भाग अननसाच्या रसात मिसळा आणि चांगलं फेटून घ्या. आता त्यात एक चमचा बदाम तेल घाला. हे मिश्रण नखांवर लावा आणि ते कोरडं होईपर्यंत ठेवा. हळूहळू नखं निरोगी होतील. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, Skin, Skin care

    पुढील बातम्या