मुंबई, 06 एप्रिल : आजही मूळव्याधीसारख्या (piles) आजारावर उघडपणे बोललं जात नाही आणि त्यामुळे अनेक व्यक्ती उपचारास टाळाटाळही करत असल्याचं दिसून येतं. मात्र अनेकदा घरगुती उपायांचा वापर करून या आजारावर उपचार केले जातात तर दुष्काळजीपणामुळे काही रुग्णांना कर्करोगाचे निदान होऊ शकते. कोलोरेक्टल कॅन्सर आणि मूळव्याध हे दोन वेगवेगळे आजार असले तरी त्या दोघांमध्ये काही लक्षणं सारखीच आढळतात. त्यामुळे वेळीच निदान करून उपचार करणं गरजेचे आहे.
मूळव्याध आणि कोलोरेक्टर कॅन्सर यांच्यामध्ये सर्वात सारखं असलेलं रक्त म्हणजे मलातून रक्त जाणं. त्यामुळे अनेकदा कॅन्सर असला तरी लोक तो मूळव्याध आहे, असं समजून त्यावर उपचार करत राहतात. आता हा होणारा रक्तस्राव नेमका मूळव्याधचा आहे की कॅन्सरचा हे कसं ओळखावं?
मूळव्याध आणि कोलोरेक्टल कॅन्सर यामध्ये काय फरक आहे?
गुद्द्वार जवळ खाज सुटणं आणि रक्तस्त्राव होणं, मलातून रक्त येणं, गुद्द्वाराजवळ गुळळ्या होणं आणि आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान वेदना होणं ही मूळव्याधीची लक्षणे आहेत. तर कोलोरेक्टल कॅन्सर असलेल्या व्यक्तींना सुरुवातीला फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र काही कालावधीनंतर पोटदुखी, नकळत वजन कमी होणं, मलावाटे रक्त येणं, मळमळ आणि मलाशयातून रक्तस्त्राव होणं ही त्याची लक्षणे आहेत.
मूळव्याधांची आणि कोलोरेक्टर कॅन्सरची कारणे
गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की मूळव्याधीचा त्रास होतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. गर्भावस्थेदरम्यानही मूळव्याधीचा त्रास उद्भू शकतो.
हे वाचा - कोणताही डाएट नाही तर फक्त बिअर पिऊन फॅट टू फिट; घटवलं तब्बल 18 किलो वजन
तर अनुवांशिकता आणि कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान करणे आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वय तसंच एचपीव्ही व्हायरसची लागण (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस संसर्ग) कोलोरेक्टर कॅन्सरची लक्षणं आहेत.
मूळव्याध आणि कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान कसं करतात?
मूळव्याधीचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ गुदाशयाची तपासणी करतात. जर असामान्य वाढ झाली की मूळव्याध नसल्यास आपल्याला कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी करण्यास सांगितलं जाईल. कोलोरेक्टल कर्करोग शोधण्यासाठी डॉक्टर आपल्या सिग्नोइडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपीद्वारे आपल्या कोलनमध्ये पॉलिप्स अस्तित्त्वात आहेत किंवा नाही आणि ते कर्करोगाशी संबंधित आहेत की नाही याची तपासणी करतात.
मूळव्याध आणि कोलोरेक्टल कर्करोगावर उपचार
मूळव्याधावर औषधोपचार, सिटझ बाथ घेणं, फायबरयुक्त अन्नाचे सेवन करणं, बद्धकोष्ठतेसारख्या समस्येपासून दूर राहणं, व्यायाम करणं आणि भरपूर पाणी पिणं हे काही आपल्या हातात असलेले उपाय आहेत. तर डॉक्टर शस्त्रक्रिया करून या समस्येपासून मुक्ती देतात.
हे वाचा - आश्चर्य! 3 Penises सह जन्माला आलं बाळ; पाहून डॉक्टरही झाले हैराण
कोलोरेक्टल कर्करोगाचा सामना करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रिया, केमोथेरपी ,रेडिएशन थेरेपी, टार्गेटेड थेरपी निवडण्यास सांगतील. उपचार कर्करोगाच्या स्थानावर आणि टप्प्यावर अवलंबून असतील. कोलोरेक्टल कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी वेळीच निदान करणं गजचेचे आहे. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार न करता वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.