ही नवरी असली... ही लेहेंगा विसरली...???

ही नवरी असली... ही लेहेंगा विसरली...???

  • Share this:

06 जून : भारतीय लग्न म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ?  लग्नघर, रोषणाई, नाचणारे वऱ्हाडी आणि वाजंत्री, सुग्रास जेवण डोळ्यासमोर येतं. पण या लग्नांचे प्रमुख आकर्षण असतं ते लाजरी -बुजरी, नटलेली आणि हळदीच्या रंगात रंगलेली नवरी. नवरीचा पोशाख नेहमीच चर्चेत असतो. तिनं काय घातलंय याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण अशीच नवरी जर  शॉर्टस् घालून आली तर?

हा पराक्रम केलाय एका  पंजाबी नवरीने. ही नवरी छान नटलीय. घुंघटही तिनं घेतलाय.  पण लेहेंगा घालण्याचं सोडून ही  चक्क शॉर्टस घालून आली. सध्या हा फोटो आणि व्हिडिओ वायरल झालाय.

पुढे काही अंदाज  लावण्याआधी हे जाणून घ्या की ही नवरी- लाल चोळीने सजली होती,भरजरी  दागिन्यांनी नटली होती,लग्नाला शोभेल असा मेक-अपही तिने केला होता .फक्त लेहेंग्याच्या जागी  शॉर्टस घालून ती नवऱ्यासोबत हातात हात घालून चालत  होती.

परंपरा आणि आधुनिकतेचे  परफेक्ट कॉम्बिनेशन असणाऱ्या या नवरीच्या व्हिडिओने  सोशल मीडियावर खळबळ माजवलीय. लग्नासाठी नट्टा-पट्टा सगळ्याच नवऱ्या करतात पण  शॉर्टस घालणारी ही नवरी कुछ हटकेच.

First published: June 6, 2017, 3:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या