धक्कादायक! पोटच्या लेकीचा वापर करून आईनं अल्पवयीन मुलाला बनवायला लावली Pornography

धक्कादायक! पोटच्या लेकीचा वापर करून आईनं अल्पवयीन मुलाला बनवायला लावली Pornography

सोशल मीडियावर ही महिला या मुलाला आमिष दाखवत होती, शिवाय त्याला आत्महत्येसाठी प्रयत्न करण्यासही प्रवृत्त केलं.

  • Share this:

फिलाडेल्फिया, 14 जानेवारी : यूएसमध्ये आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिथं एका आईनं आपल्या पोटच्या लेकीचा वापर करून तिच्याच वयाच्या अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडून त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून घेतले. इतकंच नव्हे तर त्याला आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करण्यासही प्रवृत्त केला. यासाठी तिला आता आजीवन कारावास ठोठावण्यात आली आहे.

फिलाडेल्फियामधील ही धक्कादायक घटना. 45 वर्षांच्या या महिलेवर ऑक्टोबर 2019 मध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी (child pornography) बनवल्याचे आणि एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवल्यानं (enticement offenses) कारवाई करण्यात आली होती.  लिंडा पाओलिनी  (Linda Paolin) असं या महिलेचं नाव आहे.

लिंडानं  फ्लोरिडात राहणाऱ्या 16 वर्षांच्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं. त्याच्याशी सोशल मीडियावर ती सेक्सबाबत बोलायची. त्याला हस्तमैथुन करायला लावायची आणि ते व्हिडीओही पाठवायला सांगायची. यासाठी तिनं आपल्या पोटच्या लेकीचाही वापर केला. स्वतःच्यातच मुलीचे फोटो पाठवून ती त्या मुलाला उत्तेजित करायची. माझी मुलगी तुझ्याझ वयाची आहे ती तुझ्या प्रेमात पडली आहे, असं त्या मुलाला सांगायची.

हे वाचा - धक्कादायक! बाल लैंगिक शोषण करणाऱ्या बडतर्फ BJP नेत्याचा किळसवाणा VIDEO आला समोर

इतकंच नव्हे तर ऑनलाइन व्हिडीओ चॅटदरम्यान तिनं आपण मुलाशी एकनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्वत: आत्महत्या करत असल्याचा बनाव रचला आणि मुलालाही आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडलं.असं तिनं फक्त एकाच मुलासोबदत नाही तर कमीत कमी आणखी दोन मुलांसोबत केलं आहे. त्यामुळे तिला युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टानं  (United States District Court) तिला शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 36 वर्षांचा कारावास तिला ठोठावण्यात आला आहे.

Published by: Priya Lad
First published: January 14, 2021, 5:50 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading