वॉशिंग्टन, 11 नोव्हेंबर : अमेरिकन कंपनी Pfizer ने तयार केलेली लस कोरोनावर 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा कंपनीने सोमवारी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचं प्राथमिक अभ्यासाच दिसून आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्यामुळे आता या कोरोना लशीबाबत आशा पल्लवित झाला आहे. या लशीचीही संपूर्ण जगाला प्रतीक्षा आहे. मात्र लशीशिवाय Pfizer कंपनी वेगळ्याच कारणआमुळे चर्चेत आली आहे.
Pfizer कंपनीबाबत नेटिझन्सना प्रश्न पडला आहे तो म्हणजे या कंपनीच्या नावाचा उच्चार नेमका कसा करायचा? पफायझर, फीजर असे अनेक उच्चार सुचवले जात आहेत.
how do you pronounce Pfizer? I want to appear like I know what I'm talking about when speaking to real people
— Kieran Hurley (@kieran_hurley) November 9, 2020
कंपनीच्या नावावरून प्रश्न उपस्थित होताच अनेक मीम्सही तयार झाले. ज्यांना या कंपनीच्या नावाचा उल्लेख बरोबर करता येईल त्यांनाच कंपनी लस देणार आहे, कंपनीच्या नावाचा उच्चार शिकण्यासाठी मी दिवस घालवला, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर याचा उच्चार कसा करतील याचा विचार करा, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या.
You think your life is hard? Imagine Javed Akhtar trying to pronounce Pfizer.
— Ripper (@Ace_Of_Pace) November 9, 2020
तर एका ट्विटर युझरने गुगल सर्चचा फोटो टाकत खरंच कंपनीचा उच्चार कसा करावा असं सर्चमध्ये टाकलं आहे.
फायझर कंपनीने आपली जर्मन पार्टनर बायोएनटेक कंपनीबरोबर mRNA-आधारित BNT 162 b2 ही लस कंपनीने विकसित केली आहे. SARS-CoV-2 ची आधी लागण न झालेल्या कोरोना रुग्णांवर केलेल्या चाचणीत ही लस प्रभावी ठरली आहे.
या महिन्याच्या शेवटी या लशीसंदर्भात आणि प्रभावाबद्दल अधिक माहिती समोर येईल. याच महिन्यात या लशीच्या वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याचीही शक्यता आहे. वर्षाअखेरीस या लशीचे 5 कोटी डोसदेखील तयार होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.