पेरू, 28 नोव्हेंबर : नदी (river) म्हटलं की सामान्यपणे थंडगार, शांत आणि झुळझुळ आवाज करत वाहणारी. पाणी उकळत्या पाण्याची नदी कधी पाहिली आहे का? पेरू देशाला लागून असलेल्या अमेझॉनच्या जंगलाच्या भागात सतत उकळत राहणारी एक नदी असून तिला वैज्ञानिक Boiling River म्हणतात. जगभरातील सर्वात मोठी थर्मल नदी असून या नदीच्या या रहस्याचा अनेक वर्षांपासून शोध घेतला जात आहे.
2011 मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ आंद्रे रुझो यांनी या नदीचा शोध लावला होता. या नदीला मयानतुयाकू नदी देखील म्हटलं जातं. या नदीच्या शोधासाठी आंद्रे यांनी खूप कष्ट घेतले होते. आंद्रे यांनी लहानपणी आपल्या आजोबांकडून या उकळत्या नदीविषयी गोष्ट ऐकली होती. त्यामुळे या नदीचा शोध घेण्याचं त्यांनी आपल्या मनाशी पक्के केले होते. भूगर्भशास्त्रज्ञ झाल्यावर आंद्रेने या नदीचा शोध सुरू केला. यासाठी त्यांनी सरकार आणि गॅस कंपन्यांकडेही विचारपूस केली. पण कुठूनही त्यांना उत्तर मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी खाणींमध्येदेखील शोध घेतला. कुठेही माहिती न मिळाल्याने त्यांनी स्वतःच या नदीचा शोध सुरू केला.
या नदीच्या शोधात निघाले असता त्याला अॅमेझोनच्या जंगलात अशाप्रकारची नदी असल्याची शक्यता कमी असल्याचं काही वैज्ञानिकांनी सांगितलं होतं. अॅमेझॉन जंगल हे जिवंत ज्वालामुखीपासून खूप दूर असून याठिकाणी अशाप्रकारची कोणतीही नदी नसावी, असं वैज्ञानिक म्हणाले. त्यावेळी आंद्रे टेक्सास विद्यापीठात पीएचडी करत होते. 2011 मध्ये त्यांनी याचा शोध सुरू केला.
हे वाचा - मुक्या जीवाला मारताच शिकारीच झाला बंदुकीचा शिकार; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
पेरूला लागून असलेल्या जंगलात त्यांना ही उकळती नदी सापडली. चार मिलपर्यंत पसरलेल्या या नदीकाठी पेरूमधील स्थानिक Asháninka जनजातीचx वास्तव्य आहे. या नदीला ते पवित्र नदी मानत असून या नदीला मयानतुयाकू नदी देखील म्हणतात. डेली मेलच्या वृत्तानुसार, आंद्रे यांनी टेक टॉकमध्ये सांगितलं, नदीतील पाणी खूप गरम आहे. आपण त्यात बोट ठेवले तर एका सेकंदाच्या आत थर्ड डिग्रीपर्यंत भाजले जाऊ शकता. आपण प्राणी या नदीत कसे पोळून निघत होते, ते प्रत्यक्षात पाहिल्याचंही त्यांनी सांगितलं. या नदीवर त्यांनी 'द बोइंग रिव्हर: अॅडव्हेंचर अँड डिस्कव्हरी इन अॅमेझॉन' नावाचे पुस्तक देखील लिहिलं आहे
या नदीच्या जवळील ज्वालामुखी देखील सुमारे 700 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ज्वालामुखीमुळे नदीचं पाणी उकळत नाही. मग पाणी का उकळत आहे? जमिनीच्या खाली होत असलेल्या प्रक्रियेमुळे पाणी उकळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र वैज्ञानिक त्यावर संशोधन करत असून नक्की काय कारण आहे याचा शोध घेतला जात आहे.
हे वाचा - पंडित नेहरुंच्या बहिणीलाही करायचं होतं मुस्लीम व्यक्तीशी लग्न पण...
आपल्या पूर्वजांना या नदीबद्दल माहित असावे. त्यावेळी आंद्रेनुसार या नदीचं नाव Shanay-timpishka होतं, म्हणजेच सूर्याच्या उष्णतेमुळे गरम झालेलंं पाणी. सध्या नाडीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी एक प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये जवळपास राहणारे आदिवासी समुदायदेखील जोडले गेले आहेत. नदी पाहायला येणाऱ्या पर्यटकांना देखील नदीमध्ये काहीही न टाकण्याचं तसंच त्यामध्ये पोहण्याचं आवाहन करण्यात येतं. जवळपास 80 डिग्री सेल्सियस गरम असणारे हे पाणी काही सेकंदामध्ये तुम्हाला जखमी करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.