मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

45 वयाच्या व्यक्तींसाठी जास्त धोकादायक ठरतोय कोरोना; डॉक्टरांनी सांगितली कारणं

45 वयाच्या व्यक्तींसाठी जास्त धोकादायक ठरतोय कोरोना; डॉक्टरांनी सांगितली कारणं

नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबईस्थित एका स्टार्टअपने कोरोना व्हायरस किलर मास्क तयार केला आहे. याची खास गोष्ट अशी की, या मास्कचा वापर केल्यावर, कोरोना विषाणूपासून संक्रमण पसरवण्याचा धोकादेखील पूर्णपणे दूर होतो. तसंच, हा मास्क त्याच्या धुवून 60 ते 150 वेळा वापरला जाऊ शकतो.

नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबईस्थित एका स्टार्टअपने कोरोना व्हायरस किलर मास्क तयार केला आहे. याची खास गोष्ट अशी की, या मास्कचा वापर केल्यावर, कोरोना विषाणूपासून संक्रमण पसरवण्याचा धोकादेखील पूर्णपणे दूर होतो. तसंच, हा मास्क त्याच्या धुवून 60 ते 150 वेळा वापरला जाऊ शकतो.

45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोनाची लागण जास्त प्रमाणात होते आहे.

  • myupchar
  • Last Updated :

भारतात कोरोना रुग्णांची संख्या जितक्या वेगाने वाढते आहे त्याच वेगाने लोक बरेही होत आहेत. म्हणजेच लोक बरे होण्याचा दर वाढता आहे आणि मृत्युदर कमी होतो आहे. त्यामुळे परिस्थिती चांगली होते आहे. कारण आधी संक्रमितांचा आकडा वाढत होता पण आता बरे होण्याचा दर आधीपेक्षा चांगला झाला आहे.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं, ज्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते आपोआप बरे होत आहेत, पण जे कमजोर आणि वयाने जास्त आहेत त्यांच्या जीवाला मात्र धोका आहे.

मे महिन्यात 50 टक्के होता बरे होण्याचा दर

मे महिन्यात बरे होण्याचा दर 50 टक्केच होता पण आता तो 62.09 टक्के झाला आहे. याचाच अर्थ परिस्थिती चांगली होते आहे. पण चिंतेची बाब अशी आहे की, 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोनाची लागण जास्त प्रमाणात होते आहे. मृतांमध्ये सर्वाधिक लोक हे 45 पेक्षा अधिक वयाचे आहेत. काही 80 वर्षे वय असलेले लोक पण बरे झालेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे.

85 टक्के मृत 45 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 85 टक्के मृत हे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. कोरोनाचा सगळ्यात वाईट परिणाम या लोकांवर होतो आहे. हे सर्व इतर कुठल्यात तरी गंभीर आजारांनी ग्रासित होते, ज्यात हृदय, मधुमेह, किडनी, फुफ्फुस या संबंधित रोग होते. 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना रक्तदाब आणि मधुमेह जास्त प्रमाणात असतो आणि म्हणूनच त्यांना याचा धोका जास्त असतो.

रोगप्रतिकारशक्ती हे एक मोठे कारण

45 वर्षे वय असणाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती आधीच इतर रोगांशी लढत असते. कोरोनामुळे ती अजून कमजोर होते आणि मग कोरोना विषाणू शरीरात शिरून इतर अवयवांना हानी पोहोचवतो आणि मृत्यू ओढवतो.

या लोकांनी सतर्क राहावे

जे लोक आधीपासूनच आजारांनी बाधित आहेत त्यांनी आपली विशेष काळजी घ्यायला हवी. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, सर्वच वयोगटातील लोकांनी आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी सी जीवनसत्व असलेला आहार घ्यायला हवा. 10 वर्षांपेक्षा लहान मुलांची रोगप्रतिकार शक्तीदेखील कमी असते, त्यामुळे त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, मास्क घाला. मुलांचे हात साबणाने धूत राहा. घरातील वडीलधारी माणसे बाहेर जात असतील तर त्यांच्यापासून योग्य अंतर राखा. कोरोनाचे कुठलेही लक्षण दिसत असेल तर स्वतःला पूर्णपणे क्वारंटाइन करा आणि घरातल्यांपासून दूर रहा आणि कोरोनाची चाचणी जरूर करून घ्या.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख संसर्गजन्य रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Coronavirus