मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Optical Illusion : फोटो पाहून ओळखा तुमचं व्यक्तिमत्त्व, काय आहे हे नवं कोडं?

Optical Illusion : फोटो पाहून ओळखा तुमचं व्यक्तिमत्त्व, काय आहे हे नवं कोडं?

 फोटो पाहून ओळखा तुमचं व्यक्तिमत्त्व

फोटो पाहून ओळखा तुमचं व्यक्तिमत्त्व

टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे कोडं आधी शेअर करण्यात आलं. चार्ल्स मेरियट यांनी ते शेअर केलंय.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 31 मार्च- ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम तयार करणारी चित्रं किंवा फोटोज मेंदूला चालना देतात. या चित्रांचं रहस्य उलगडणं सोपं नसतं. अशा चित्रांमध्ये किंवा फोटोजमध्ये एखादी वस्तू किंवा चित्र इतर चित्रांमध्ये किंवा वस्तूंमध्ये अशा प्रकारे एकत्र केलेलं असतं, की बघणाऱ्याचा गोंधळ होतो. त्यासाठी बरेचदा एकाच रंगसंगतीचा, चित्राच्या डिझाइनचा किंवा पॅटर्नचा वापर केलेला असतो. अशा प्रकारचे फोटो किंवा चित्रं ही मेंदूला खाद्य पुरवणारी असतात. दृष्टिभ्रमाच्या काही फोटोजद्वारे व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होतो. असाच एक फोटो सध्या खूप व्हायरल होतोय. यात तुम्हाला सर्वांत आधी काय दिसलं, यावर तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे ठरेल.

  टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे कोडं आधी शेअर करण्यात आलं. चार्ल्स मेरियट यांनी ते शेअर केलंय. या कोड्यामध्ये एक फोटो दिसतोय. त्यात काही फुलं दिसत आहेत. ही फुलं पूर्णपणे उमलली नाहीयेत. हा फोटो पाहून अनेकांना हेच दिसलं असेल; मात्र काहींना या फोटोत एक चेहराही दिसला आहे. तुम्हाला यात काय दिसलं, यावर तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे सांगता येईल.

  वाचा-आज पुष्य नक्षत्राचा योग, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक व खरेदीसाठी शुभ दिवस आहे

  तुम्हाला यात सगळ्यात आधी फुलं दिसली, तर याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला खूप लवकर कंटाळा येतो. तुम्हाला इतरांमध्ये मिसळण्याची आवश्यकता आहे. तुम्ही स्वतःला कामात गुंतवून ठेवलं पाहिजे; पण जर तुम्हाला या फोटोत मानवी चेहरा दिसला, तर याचा अर्थ तुमच्याकडे खूप सहनशक्ती आहे. फोटोतला चेहरा तुम्ही आधी पाहिला म्हणजे कोणत्याही गोष्टीचा तुम्ही सखोल अभ्यास करता. तुम्हाला सौंदर्य आवडतं व तुम्ही यशस्वी होऊ शकता.आपल्या व्यक्तिमत्त्वातले काही बारकावे आपल्यासमोर पटकन येत नाहीत. अशा वेळी स्वतःविषयी जाणून घ्यायचं असेल, तर या ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

  ऑप्टिकल इल्युजन्स अर्थात दृष्टिभ्रम तयार करणं हे तितकं सोपं नाही. तसंच ते सोडवणंही खूप अवघड असतं. मेंदूच्या विकासासाठी हा खूप चांगला सराव असतो. एखादी गोष्ट खरोखरच आहे की नाही, हे तपासणं मेंदूला अधिक सक्षम बनवतं. एखाद्या चित्रावरून नजर फिरवणं आणि काळजीपूर्वक पाहणं यातला फरक अशा प्रकारच्या चित्रांवरून स्पष्ट होतो. लहान मुलांसाठीही या एक्सरसाइजचा फायदा होतो. यामुळे आकलनक्षमता विकसित होण्यास मदत होते. विचार करण्याची क्षमता वाढते. एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्याचं कौशल्य वाढतं. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. त्याला युझर्सकडून खूप लाइक्स मिळतात.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle