ताप, वेदना, मळमळ; महिलांनो लक्ष द्या, तुम्हाला असू शकतो ‘हा’ फ्लू

ताप, वेदना, मळमळ; महिलांनो लक्ष द्या, तुम्हाला असू शकतो ‘हा’ फ्लू

मासिक पाळी (Menstrual period) येण्याच्या आधी महिलांमध्ये अशा समस्या उद्भवतात. याला पीरियड फ्लू (Period flu) असं म्हणतात.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : दर महिन्याला तुम्हाला ताप येतो का?, शरीरामध्ये वेदना होतात?, मळमळल्यासारखंही वाटतं? आपण आजारी तर पडलो नाही ना असा विचार तुमच्या मनात येतो. साहजिकच फ्लूसारखी दिसणारी ही लक्षणं. मात्र दर महिन्याला तुमच्या पीरियड्सच्या (Menstrual period) आधी म्हणजेच मासिक पाळीच्या आधी अशी लक्षणं दिसत असतील, तर तुम्हाला आजारी पाडणारा सामान्य फ्लू नाही तर पीरियड फ्लू झाला आहे.

पीरियड फ्लू काय आहे?

महिलांना मासिक पाळी येण्यासाठी Premenstrual syndrome (PMS) ची समस्या उद्भवते पीरियड फ्लू याच Premenstrual syndrome (PMS) चा एक भाग आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, मासिक पाळी येताना महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. पीरियड फ्लूमधली लक्षणं प्रेग्नन्सीच्या लक्षणांप्रमाणे असल्याने काही महिलांना आपण प्रेग्नन्ट असल्यासारखं वाटतं.

हेदेखील वाचा : महिलांनो Vagina Discharge बाबत तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात

पीरियड फ्लूची लक्षणं

पोटात मुरडा येणे

स्नायूंमध्ये तीव्र वेदना

ताप, थंडी लागणे

चक्कर

उलटी, मळमळ

बद्धकोष्ठता

डायरिया

थकवा

आळस

डोकेदुखी

हेदेखील वाचा :  प्रेग्नन्सीत ब्लीडिंगमुळे होणारा गर्भपात टळणार, 'ही' हार्मोन थेरेपी वरदान ठरणार

पीरियड फ्लूवर उपचार

शक्य तितका आराम करा

वेदना होणाऱ्या भागाला हिटिंग पॅडने शेक द्या

भरपूर प्रमाणात पाणी प्या, शक्यतो उकळून प्या

ज्युस प्या

भाज्यांचं सेवन भरपूर करा

तणाव कमी घ्या

आवडीची काम करा

पुरेशा प्रमाणात झोप घ्या

पीरियड फ्लू मासिक पाळीच्या विशिष्ट कालावधीपुरताच मर्यादित असतो. त्यामुळे तसं काळजीचं कारण नाही, मात्र तुम्हाला दैनंदिन कामंही करणं शक्य होत नसेल, इतकी गंभीर तीव्रता असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

First published: February 6, 2020, 2:54 PM IST

ताज्या बातम्या