Home /News /lifestyle /

कुठं कुठं जायचं हनीमूनला? पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद; क्षण होतील यादगार...

कुठं कुठं जायचं हनीमूनला? पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद; क्षण होतील यादगार...

कुठं कुठं जायचं हनीमूनला? पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद; क्षण होतील यादगार...

कुठं कुठं जायचं हनीमूनला? पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद; क्षण होतील यादगार...

Best Honeymoon Destination in Rainy Season- नुकतंच लग्न झालेली तसेच लवकरच विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत असलेली अनेक जोडपी लग्नानंतर हनीमूनला (Honeymoon Destination) जाण्याचा विचार करत असतील. परंतु पावसाळ्यात भेट देता येतील, अशा रोमँटिक हनीमून डेस्टिनेशनबद्दल ते संभ्रमात असतील. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हनिमूनला जायचे असेल तर ही ठिकाणे एकदम परफेक्ट आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : पावसाळा (Rainy Season) हा अनेकांच्या आवडीचा ऋतू. रिमझिम पाऊस, कोसळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग सगळं कसं आपल्याला अगदी हवं तसं वातावरण...मग अशा पावसाळ्यात जर तुमचं लग्न झालं तर मग विषयच भारी...सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यंदा 8 जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे नुकतंच लग्न झालेली तसेच लवकरच विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत असलेली अनेक जोडपी लग्नानंतर हनीमूनला (Best Honeymoon Destinations) जाण्याचा विचार करत असतील. परंतु पावसाळ्यात भेट देता येतील, अशा रोमँटिक हनीमून डेस्टिनेशनबद्दल ते संभ्रमात असतील. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हनिमूनला जायचे असेल तर ही ठिकाणे एकदम परफेक्ट आहेत. या ठिकाणांना भेट दिल्यास मधुचंद्राच्या आनंदात भर पडेल. चला, जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल- केरळ (Kerala)- केरळ हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. केरळमध्ये प्रत्येक हंगामात पर्यटक येतात. प्री वेडिंग शूट, हनिमून आणि बेबीमूनसाठी अनेक जोडपी केरळमध्ये येतात. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात हनिमूनला जायचे असेल तर कोवलम हे योग्य ठिकाण आहे. कोवलममध्ये तुम्ही आयुर्वेदिक कपल्स स्पा चा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी, बोटींगचा आनंदही घेऊ शकता. एकंदरीत कोवलम मधुचंद्रासाठी सर्वोत्तम आहे. हेही वाचा- पुण्याजवळची पावसाळ्यात फिरण्याजोगी 7 सर्वोत्तम ठिकाणे लडाख (Ladakh)- लडाखचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. लडाखमध्ये फार कमी पाऊस पडतो. त्यामुळे हनिमून ट्रिपला त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तंबूत मुक्काम करू शकता. याशिवाय लडाखमध्ये उंट सफारीचा आनंद लुटता येतो. जयपूर, राजस्थान (Jaypur, Rajasthan)- जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. जयपूरमध्ये पावसाळ्यात रिमझिम पावसात तुम्ही हनिमूनचा आनंद घेऊ शकता. या शहरात जगप्रसिद्ध इमारती, राजवाडे आहेत. जिथे तुम्ही तुमचं हनिमून अविस्मरणीय बनवू शकता. हेही वाचा- दूध आवडत नसेल तर शाकाहारी लोकांनी हे 6 पदार्थ खा; कॅल्शियम कधी कमी नाही पडणार गोवा (Goa)- जर तुम्हाला समुद्रकिनारी हनिमून साजरं करायचा असेल तर गोवा हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हनिमूनसाठी मोठ्या संख्येने जोडपी गोव्यात जातात. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात गर्दी कमी असते. पावसाळ्यात तुम्ही कमी बजेटमध्ये गोव्यात राहू शकता. गोव्याच्या आसपास अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सर्वोत्तम क्षण घालवू शकता.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Couple, Monsoon, Rain, Travelling

    पुढील बातम्या