ज्यांची उंची -कमी त्यांना असतो मधुमेहासोबत या आजारांचा सर्वाधिक धोका

कोणाचीही उंची सर्वसामान्य मापदंडापेक्षा कमी असते त्यांना वेगवेगळ्या पातळीवर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 03:49 PM IST

ज्यांची उंची -कमी त्यांना असतो मधुमेहासोबत या आजारांचा सर्वाधिक धोका

कोणाचीही उंची सर्वसामान्य मापदंडापेक्षा कमी असते त्यांना वेगवेगळ्या पातळीवर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नुकत्याच एका शोधात सर्वसामान्य उंचीपेक्षाही ज्यांची उंची कमी असते त्यांना मधुमेहाचा धोका संभावतो असं समोर आलं आहे. यासोबतच इतर अनेक आजारही त्यांना इतरांपेक्षा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असता. नवीन संशोधनात हे सिद्ध झाल आहे की, उंच लोकांच्या तुलनेत ज्यांची उंची कमी असते त्यांना टाइप 2 डायबेटीसचा धोका सर्वाधिक असतो. अभ्यासानुसार, जर कोणाची उंची 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना मधुमेह होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

महिला आणि पुरुषांचे मापदंड वेगळे- महिलांमध्ये ज्यांची उंची 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका 33 टक्क्यांनी कमी असतो तर पुरुषांची उंची वाढल्यास हा धोका 41 टक्क्यांनी कमी होतो.

हृदयाशीनिगडीत आजार वाढण्याचा धोका जास्त- संशोधनानुसार, उंच असणाऱ्या लोकांच्या लीवरमध्ये कमी उंचीच्या लोकांपेक्षा फॅट कन्टेट कमी प्रमाणात असतात. यासोबतच कमी उंचीच्या लोकांच्या शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होतं. या सर्वांचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी उंचीच्या लोकांना हृदयाशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात.

लांब पायांच्या लोकांना असतो कमी धोका- लांब पाय पाहायला जेवढे आकर्षक वाटतात तेवढेच ते आरोग्यासाठीही चांगले असतात. ज्या पुरुष आणि महिलांचे पाय शरीरापेक्षा जास्त लांब असतात त्यांना मधुमेहाचा धोका तेवढाच कमी असतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Loading...

Vastushastra: घराच्या मुख्य दरवाजाकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर व्हाल कंगाल!

पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

विमानातून प्रवास करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...