एकटे राहणारे असतात इंटेलिजेंट! संशोधनात झालं सिद्ध

एकटे राहणारे असतात इंटेलिजेंट! संशोधनात झालं सिद्ध

सोशल मीडियावर कमी सक्रिय असलेले लोक कंटाळवाणे असतात असा अनेकांचा समज असतो. पण, प्रत्येकवेळी ते खरं असतंच असं नाही.

  • Share this:

एकटे राहणारे किंवा सोशल मीडियावर कमी सक्रिय असलेले लोक कंटाळवाणे असतात असा अनेकांचा समज असतो. पण, प्रत्येकवेळी ते खरं असतंच असं नाही. त्यांच्यातही एक खास गोष्ट असते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, एकटे राहणारे लोक इतरांपेक्षा जास्त हुशार असतात. वर्ल्ड इकनॉमिकल फोरमने हे संशोधन केलं आहे.

18 ते 28 वयोगटातील सुमारे 15 हजार लोकांवर हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनात त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून एकटे राहणारे जास्त हुशार असतात हे सिद्ध झालं. लोकांना भेटल्यावर किती चांगलं वाटत अशा धाटणीचे अनेक प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आले.

या संशोधनात हे समोर आलं की, ज्यांना फार गोतावळ्यात रहायला आवडत नाही. तसेच फार लोक अवती- भवती असले की गुदमरल्यासारखं वाटतं ते इतरांच्या तुलनेत जास्त हुशार असतात. बुद्धीमान लोकांना समाजात फार मिसळायला आवडत नाही.

या लोकांची एकटं राहण्याची कारणं अनेक आहेत. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यावर त्यांचा विश्वास असतो. याशिवाय मित्र- मैत्रिणींच्या गोतावळ्यात राहण्यापेक्षा त्यांना अंर्तमुख होणं जास्त आवडतं.

व्हायरल तापापासून वाचण्यासाठी हे 4 घरगुती उपाय करून पाहा, मिळेल लगेच आराम

चांगल्या झोपेसाठी आजच करा ही कामं...

मेडिटेशन करताना जर असं काही झालं तर लगेच सोडून द्या ध्यान!

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 25, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या