Home /News /lifestyle /

लठ्ठपणा कमी करण्यासाठी चुकूनही वापरू नका 'हा' पर्याय; अन्यथा बेतू शकतं जीवावर, तज्ज्ञांचं मत

लठ्ठपणा कमी करण्यासाठी चुकूनही वापरू नका 'हा' पर्याय; अन्यथा बेतू शकतं जीवावर, तज्ज्ञांचं मत

बावीस वर्षीय कन्नड अभिनेत्री चेतना राज (Chetana Raj) हिचा फॅट फ्री-प्लास्टिक सर्जरी करताना मृत्यू झाला. यामुळे लिपोसक्शन अर्थात फॅट फ्री-प्लास्टिक सर्जरी करताना काळजी घेणं गरजेचं असल्याचं अधोरेखित झालं आहे.

    मुंबई, 21 मे : आपल्या जीवावर उदार होऊन शरीराला सुडौल बनवणं महागात पडू शकतं. कारण निसर्गतः जे शरीर मिळालेलं असतं, ते स्वीकारणंच हिताचं असतं. त्यात थोडेफार बदल करून सुधारणा करणं मात्र शक्य असतं. याचा अर्थ अनेकजण चुकीचा घेतात आणि स्वतःच्या शरीरावर प्लॅस्टिक सर्जरी (Plastic Surgery) अर्थात लिपोसक्शन करून आहे ते शरीर पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूड, टॉलिवूडमध्ये हे फार प्रचलित आहे. पण, असं करणं कधीतरी जीवावरही बेतू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लिपोसक्शन (Liposuction) हे बेढब शरीराला आकार देण्यासाठी केलं जातं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. बावीस वर्षीय कन्नड अभिनेत्री चेतना राज (Chetana Raj) हिचा फॅट फ्री-प्लास्टिक सर्जरी करताना मृत्यू झाला. यामुळे लिपोसक्शन अर्थात फॅट फ्री-प्लास्टिक सर्जरी करताना काळजी घेणं गरजेचं असल्याचं अधोरेखित झालं आहे. “ही शस्त्रक्रिया दंड, मांड्या, पाठ, नितंब, पोटावरील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी केली जाते.” असं दिल्लीतील वसंत कुंज भागातील फोर्टिस रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. रश्मी तनेजा यांनी सांगितलं. लिपोसक्शन ही सरसकट कोणीही करू शकेल अशी शस्त्रक्रिया नाही. जास्त वजन असणारे आणि ज्यांचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय (BMI) 30 पेक्षा कमी आहे, त्यांनाच ही शस्त्रक्रिया करता येते. अशा व्यक्तींना चरबी कमी (Reduce Fat) करता येत नाही, त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागते, असंही त्यांनी सांगितलं. आता तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं होईल सोप्प, फक्त त्यासाठी एकच गोष्ट करा! लिपोसक्शन हा वजन कमी करण्यासाठीचा मार्ग नसून चरबी कमी करण्यावर उपाय आहे. लठ्ठ लोकांना या शस्त्रक्रियेमुळे अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कारण लिपोसक्शनमुळे त्यांच्या शरीरात संपूर्णपणे बदल होतातं. याच कारणासाठी लिपोसक्शन करण्यापूर्वी वैद्यकिय सल्ला घ्यावा असं डॉ. तनेजा सांगतात. त्या म्हणाल्या,“ओबेसिटी (Obesity) अर्थात लठ्ठपणाशी निगडीत अनेक आजार आहेत. 30 पेक्षा जास्त बीएमआय असणाऱ्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जात नाही, कारण त्यात धोका असतो. जितकी जास्त चरबी काढली जाते, तितका धोका वाढतो.” त्या पुढे म्हणाल्या, ‘लिपोसक्शन नाही तर बॅरिएट्रिक सर्जरी (Bariatric Surgery) ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी करता येऊ शकते. संपूर्ण वजन कमी करून वजनाशी निगडीत समस्यांवर उपाय शोधता यावा, अशा पद्धतीनं ही शस्त्रक्रिया डिझाईन करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेद्वारे रुग्ण आपल्या शरीरातील चरबी हळूहळू वापरतो, त्यामुळे हळूहळू लठ्ठपणाही कमी होतो. पर्यायानं लठ्ठपणामुळे निर्माण होणारे टाईप टू डायबेटिस, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, जॉइंट आर्थ्रायटिस, स्लीप अ‍ॅप्निया, पीसीओज आणि काही प्रकारातील कर्करोग असे आजार होऊ नयेत, यासाठी मदत होते.’ Pineapple Stem: अननसाचा अर्क या गंभीर आजारावर ठरू शकतो प्रभावी; भारतीय विद्यापीठाचा मोठा निष्कर्ष लिपोसक्शन शस्त्रक्रियेत इतरही काही धोके आहेत. त्यामुळे ती एकाच सिटींगमध्ये पूर्ण करावी लागते. यात रक्ताच्या गुठळ्या होणं, खूप रक्त जाणं, शरीराच्या विविध भागांमध्ये द्रव जमा होणं या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे यात धोका असतो. मुळातच लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिपोसक्शन ही शस्त्रक्रिया नाही. त्यातच आता ज्यांचा बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल, अशांनीही ही शस्त्रक्रिया करण्याची जोखीम पत्करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या