मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Chanakya Niti : विषारी सापापेक्षाही घातक असतात अशी माणसं; वेळीच ओळखून लांब व्हा

Chanakya Niti : विषारी सापापेक्षाही घातक असतात अशी माणसं; वेळीच ओळखून लांब व्हा

लोकांचा आधार देखील कठीण प्रसंगी आपल्याला खूप मदत करतो पण कधी-कधी सोबतचे लोकच जीवनात अनेक संकटांचे कारण बनतात. ही माणसं कशी आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

लोकांचा आधार देखील कठीण प्रसंगी आपल्याला खूप मदत करतो पण कधी-कधी सोबतचे लोकच जीवनात अनेक संकटांचे कारण बनतात. ही माणसं कशी आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

लोकांचा आधार देखील कठीण प्रसंगी आपल्याला खूप मदत करतो पण कधी-कधी सोबतचे लोकच जीवनात अनेक संकटांचे कारण बनतात. ही माणसं कशी आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

    मुंबई, 10 जुलै : चाणक्य नीतीमध्ये व्यक्तीने आयुष्यात चांगले जीवन कसे जगावे, त्रासांपासून कसे वाचायचे आणि चांगले जीवन कसे जगायचे याबद्दल माहिती दिली आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, लोकांचा आधार देखील कठीण प्रसंगी आपल्याला खूप मदत करतो पण कधी-कधी सोबतचे लोकच जीवनात अनेक संकटांचे कारण बनतात. ही माणसं कशी आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, मित्रांची निवड नेहमी काळजीपूर्वक करा. कारण चुकीच्या व्यक्तीसोबत राहिल्याने आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये फटका (Chanakya Niti) बसतो. असे लोक खूप धोकादायक असतात - आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक लिहिला आहे, ज्यामध्ये कपटी व्यक्तीची तुलना त्यांनी सापाशी केली आहे. 'दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः . सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे .. तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकायास्तु मस्तके. वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वाङ्गे दुर्जने विषम्..' या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, दुर्जन (दुष्ट, धूर्त आणि कपटी) माणसापेक्षा साप चांगला आहे. कारण साप तेव्हाच त्रास देतो, जेव्हा तुम्ही त्याला त्रास देता. पण, वाईट माणसाची संगत आपल्याला नेहमीच संकटात टाकते. काही व्यक्तींसोबत तुम्ही नेहमी चांगले वागलात तरी तो नेहमीच तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतो. असे लोक विषारी सापापेक्षा जास्त धोकादायक असतात. ते तोंडावर आपल्यासमोर चांगले वागतात आणि पाठीमागे तुम्हाला नुकसान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हे वाचा - महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय आचार्य चाणक्य म्हणतात की साप दातातून विष सोडतो, विंचूच्या शेपटीत विष असते, पण दुष्ट माणसाचे संपूर्ण शरीर आणि मन विषारी असते. तो तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, सावध राहा, अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या संगतीमध्ये राहु नका. बऱ्याचदा हे लोक आपले जवळचे नातेवाईक, भाऊ-बहीण मित्रदेखील असू शकतात. हे वाचा - महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती नीतिशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chanakya niti, Lifestyle

    पुढील बातम्या