चेन्नई, 13 जानेवारी : एखादी व्यक्ती पहिल्यांदाच फोटो (Photo) काढला जात असेल तर ती व्यक्ती सुरुवातीला लाजते किंवा घाबरते. सतत फोटो काढले जात असतील तर त्या व्यक्तीला त्याचा कंटाळाही येतो. कित्येक सेलिब्रिटींना आपण नो फोटो प्लीझ असं म्हणून किंवा हातवारे करून फोटोला नकार देताना पाहिलं आहे. पण कधी विचार केला आहे का? असे प्राणी ज्यांना सातत्यानं कॅमेऱ्याला सामोरं जावं लागत असेल त्यांना कधी कंटाळा आला नसेल का, त्यांना लाज वाटत नसेल का? मग हे प्राणी काय करतील? असाच एक मजेशीर व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. जिथं फोटो काढल्यानं हत्ती (elephant) थेट माहुताकडे तक्रार करतो.
व्हिडीओत पाहू शकता एका गेटबाहेर ही हत्तीण उभी आहे आणि महावत तिच्यासमोर बसला आहे. हत्तीण आपल्या माहुतावर सोंड फिरवते आणि त्याला खुणावण्याचा प्रयत्न करते. आपल्याच भाषेत ती त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्नही करते.
Andal from Shrirangam temple being shy of camera as she talks to her mahout ❤ pic.twitter.com/mHqJNoTCUq
@Gannuuprem ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं पोस्टमध्ये हा व्हिडीओ तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुचिरापल्लीतील (Tiruchirappalli) असल्याचं सांगितलं आहे.
तिथल्या श्री रंगनाथस्वामी मंदिरातील (Sri Ranganathaswamy temple) ही हत्तीण जिचं नाव अंडाल (Andal) आहे. मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त या हत्तीणीचेही फोटो काढतात, व्हिडीओ बनवतात. समोर कॅमेरा दिसताच, कॅमेऱ्याला समोर जाताना या हत्तीणीला लाज वाटते आणि ती आपल्या माहुताला सांगते.
व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं आहे की हत्तीण कॅमेऱ्यासमोर लाजते आहे आणि लोक फोटो काढत असल्यानं ती आपल्या माहुताकडे त्यांची तक्रार करते आहे. माहूतही तिला काय सांगायचं आहे ते ओळखतो तो तिच्याशी बोलतो. दोघांमधील संवादाच्या या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
या व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकलीत. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्या, कित्येक लाइक्स या व्हिडीओला मिळालेत. शिवाय बऱ्याच प्रतिक्रियाही या व्हिडीओवर उमटत आहेत.