Home /News /lifestyle /

Horoscope: वेळेशी पक्की एकनिष्ठ असतात या राशीची लोकं; कामात टंगळ-मंगळ अजिबात खपत नाही

Horoscope: वेळेशी पक्की एकनिष्ठ असतात या राशीची लोकं; कामात टंगळ-मंगळ अजिबात खपत नाही

काही लोक खूप वक्तशीर असतात आणि त्यांना विलंब अजिबात आवडत नाही. आज अशा या 4 खास राशींविषयी (horoscope) जाणून घेऊया.

    मुंबई, 18 जानेवारी : वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केलं आहे. या 12 राशींचे स्वतःचे असे स्वामी आहेत. तसेच, या राशींशी संबंधित सर्व लोकांचा स्वभाव, व्यक्तिमत्व वेगवेगळे असते आणि त्यांच्या आवडी-निवडी देखील एकमेकांपेक्षा भिन्न (Those who complete tasks on time and their horoscope) असतात. आपण पाहिले असेल की काही लोकांना टंगळ-मंगळ करत उशिराने कामे करायला आवडतात आणि ते त्यांच्या आयुष्याविषयी निष्काळजी असतात. पण काही लोक खूप वक्तशीर असतात आणि त्यांना विलंब अजिबात आवडत नाही. आज अशा या 4 खास राशींविषयी (horoscope) जाणून घेऊया. मेष : या राशीचे लोक अत्यंत वक्तशीर मानले जातात. त्यांना उशीर अजिबात आवडत नाही. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती निष्काळजीपणा करत असेल तर त्यांना लगेच राग येतो. तसेच, या लोकांना त्यांच्या मोकळ्या वेळेतही सक्रिय राहणे आवडते. हे लोक दिवसभर अंथरुणावर पडून किंवा त्यांचा आवडता कार्यक्रम पाहण्याऐवजी व्यायामशाळेत जातात किंवा काही प्रकारचे शारीरिक व्यायाम करतात. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे, त्याच्याकडून त्यांना हे गुण मिळतात. मिथुन : या राशीचे लोक अत्यंत वक्तशीर म्हणून ओळखले जातात. हे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी कामाचा निपटारा आधीच करतात. तसेच त्यांच्याशी कोणी निष्काळजीपणाने वागले तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मिथुन राशीच्या लोकांना त्यांचा मोकळा वेळ नवीन गोष्टी करण्यात घालवायला आवडते. हे लोक जिज्ञासू असतात आणि काही तरी नवीन शिकून त्यांचा मोकळा वेळ घालवण्यावर विश्वास ठेवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये हे गुण येतात. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात कुंभ : या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. प्रत्येक गोष्ट वेळेवर पूर्ण करण्यावर हे लोक विश्वास ठेवतात. तसेच, हे लोक वेळेचे व्यवस्थापन चांगले करतात. या लोकांना त्यांच्या फावल्या वेळेत वेगवेगळी कामे करायला आवडते आणि ते कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतात. कुंभ राशीवर शनिदेवाचे अधिराज्य आहे, शनिकडूनच त्यांना हे गुण मिळतात. कुंभ राशीच्या लोकांना मोकळा वेळ मिळेल तेव्हा समाजासाठी कोणत्याही प्रकारे योगदान देणे त्यांना आवडते. त्यामुळे ते सामाजिक उपक्रमात सहभागी होतात. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र धनु : या राशीचे लोक साहसी आणि धोका पत्करणारे असतात. ते त्यांचा मोकळा वेळ जवळपासची ठिकाणे शोधण्यात आणि नवीन गोष्टी करून पाहण्यात घालवतात. तसेच हे लोक खूप वक्तशीर असतात. त्यांना निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही. ते वेळेचा सदुपयोग करतात. गुरू हा धनु राशीचा स्वामी आहे, त्याच्याकडून हे गुण त्यांना मिळतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य राशीचक्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या