मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! ठणठणीत राहण्यासाठी इथं लोक चक्क पितात विषारी सापाचं रक्त

बापरे! ठणठणीत राहण्यासाठी इथं लोक चक्क पितात विषारी सापाचं रक्त

या देशात विषारी साप (snake) हा शक्तीचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. सापाच्या रक्तापासून त्याच्या मांसाचा वापरही औषध म्हणून केला जातो.

या देशात विषारी साप (snake) हा शक्तीचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. सापाच्या रक्तापासून त्याच्या मांसाचा वापरही औषध म्हणून केला जातो.

या देशात विषारी साप (snake) हा शक्तीचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. सापाच्या रक्तापासून त्याच्या मांसाचा वापरही औषध म्हणून केला जातो.

जकार्ता, 08  डिसेंबर : साप (snake) म्हटलं की सर्वच जण घाबरतात. मनुष्य हा सापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण इंडोनेशिया (Indonesia) हा असा देश आहे की या देशात विषारी साप हा शक्तीचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. अगदी लष्करी जवान असो की सर्वसामान्य नागरिक हे कोब्रासारख्या विषारी सापांचं रक्त अगदी चहासारखं पितात. हा प्राणी म्हणजे निसर्गानं माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असा या देशातील लोकांचा समज आहे. त्यामुळेच तेथील अन्न –धान्य बाजारात असे विषारी साप पिंजराबंद दिसून येतात. इंडोनेशियात (Indonesia) पारंपारिक उपचार पद्धतीला महत्त्व दिलं जातं. या उपचार पद्धतीनुसार जंगली श्वापदं आणि झाडांच्या आधारे कोणत्याही आजारावर उपचार करणं शक्य आहे, असं मानलं जातं त्वचा विकारांवरील (Skin disease) उपाचारांबाबत सापांचा वापर 100 वर्षांपूर्वीपासून केला जात असल्याचे उल्लेख आढळून येतात. इंडोनेशियामध्ये (Indonesia) गंभीर त्वचाविकार असलेल्या रुग्णाच्या अंगाला सापांच्या त्वचेचा लगदा करून लेप लावला जातो. त्वचा विकारांबरोबरच कॅन्सरसारख्या अन्य गंभीर विकारांमध्येही सापांचा वापर या देशात केला जातो. तसंच या देशात हृदयरोग असलेल्या रुग्णाला सापाचं विष पिण्यास दिलं जातं. तसंच दारू पिण्याआधी सापाच्या विषापासून बनवलेलं औषध संबंधितास दिल्यास दारूचा कोणताही दुष्परिणाम संबंधितावर होत नाही, असा या देशात समज आहे. सापांपासून बनवलेली औषधं ही पुरुषांना कामुक ताकद वाढीसाठी तसंच महिलांना त्वचा चमकदार आणि निरोगी राहावी यासाठी देखील उपयुक्त असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी असलेल्या जाकार्तामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत सापांचं रक्त विकलं जातं. लष्करी जवानांच्या दैनंदिन आहारात कोब्राचं रक्त आणि मांसाचा समावेश असतो. खासकरून हे रक्त जवानांना स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं मानलं जातं. हे वाचा - भारी आहे! दारूनं भरलेल्या बाथटबमध्ये डुबकी मारताच दूर होणार आजार इंडोनेशियातील (Indonesia) मुख्य बाजारात किंग कोब्रा (cobra) रेस्टॉरंटस आहेत. हे फक्त रेस्टॉरंटचं नाव नसून या रेस्टॉरंटच्या मागील बाजूस असलेल्या गोदामात कोब्रा तसेच विविध जातींचे साप ठेवलेले असतात. येथे आलेल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार आपला मेन्यू निवडता येतो. त्यानंतर सापाच्या मांसाचा वापर करून तयार केलेली डिश ग्राहकांना दिली जाते. या डिशसोबत कोब्राचे (cobra) रक्तदेखील पिण्यास दिलं जातं. सापांना मारून त्यांचं रक्त काढणं तसंच त्यांच्या विविध अवयवांचा वापर करून चविष्ट डिश बनवण्यासाठी प्रशिक्षित लोकांची नेमणूक केलेली असते. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, हे विशिष्ट मिश्रण केलेलं पेय 250,000 रुपयांना मिळतं. त्यात सापांचं पित्त आणि विषारी सापांचं रक्त मिसळलं जातं. सापांचे फायदे माहिती असणारे अनेक ग्राहक मात्र अशाप्रकारे सापांचं थेट सेवन करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी या देशात सापांपासून बनवलेली औषधं विकली जातात. ही औषधं लोशन, तेल, कॅप्सूल स्वरुपात असतात. मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र असलेल्या इंडोनेशियामध्ये अधिकृतरित्या सापांचं पालन केलं जातं. सेमारंग, सेरंग आणि तेगल या शहरांमध्ये दर सप्ताहात मोठ्या प्रमाणात जंगलांमधून आणलेल्या सापांची विक्री केली जाते. येथील एक दुकानदार एका आठवड्यात सरासरी 100 सापांची विक्री करतो. यामध्ये विविध जातींच्या सापांचा समावेश असतो. मात्र त्यात कोब्राला (cobra) सर्वाधिक पसंती असते. कोब्राला पकडणं हे सोपं काम नसतं. त्यामुळे या देशातील प्रत्येक खाद्यान्नाच्या दुकानात कोब्रा उपलब्ध होईलच असं नाही. हे वाचा - SPACE मध्ये हार्ट अटॅक आल्यास... अंतराळवीर कसा वाचवतात एकमेकांचा जीव इंडोनेशियाप्रमाणेच (Indonesia) चीनमध्ये (China) देखील पारंपारिक उपचार पद्धतीत सापांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच चीनमधील (China) जिसिकियाओ या गावात 1980 पासून कायदेशीररित्या सापांचं पालन केलं जात आहे. आता सापांचं पालन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी या भागातील शेतकरी कापूस आणि ज्यूटची शेती करत होते. मात्र सापांचं पालन त्यांना अधिक फायदेशीर वाटू लागल्यानं इथं सापांच्या पालनावर अधिक भर दिला जात आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, या गावातील सुमारे 170 कुटुंबं दरवर्षी 30 लाखांहून अधिक सापांचं पालन आणि संगोपन करतात. वसंत ऋतूत या सापांचे प्रजनन होतं. त्यानंतर त्यांचे पालन पोषण करुन हिवाळ्यात त्यांची विक्री केली जाते. या गावातील सापांची विक्री व्यापाऱ्यांमार्फत केवळ चीनमध्येच नाही तर अमेरिका (America), जर्मनी (Germany), रशिया (Russia) आणि दक्षिण कोरियामध्ये (South Korea) देखील केली जाते. चीनमधील (China) रेस्टॉरंटन्समध्ये सुक्या सापांची डिश उपलब्ध असते. एक्झॉटिक फूडमध्ये (Exotic Food) या डिशचा समावेश केला जातो. याची किंमत खूप जास्त असून ती मोठ्या रेस्टॉरंटमध्येच मिळते. साप खाण्याचा हा शौक तसा महागात देखील पडू शकतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑन टॉक्सिनॉलॉजीच्या (International Society On Toxinology) अहवालानुसार दरवर्षी इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात सुमारे 11000 सापांच्या शौकिनांचा मृत्यू हा सर्पदंशामुळे होतो.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Snake

पुढील बातम्या