या खेळामुळे कमी होतंय Depression, संशोधनात झालं सिद्ध

लोकांमध्ये नैराश्याची लक्षणं पाहिली आणि त्याची तुलना मित्र- परिवारासोबत वेळ घालवणं, माहजोंग खेळणं, एखाद्या खेळात किंवा सामाजिक क्लबमध्ये सहभागी होणं किंवा सामाजिक कार्य करणं असे सर्व पैलू तपासून पाहिले.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 02:27 PM IST

या खेळामुळे कमी होतंय Depression, संशोधनात झालं सिद्ध

चीनमधील माहजोंग (Mahjong Game) या खेळामुळे मध्यमवयीन तसेच वयस्कर लोकांमधील नैराश्य दूर होत असल्याचं समोर आलं आहे. जर्नल सोशल सायन्स अँड मेडिसिनमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, माहजोंग हा गेम सतत खेळल्यामुळे चीनमधील मध्यमवयीन आणि वयस्कर व्यक्तींमधील नैराश्याचं प्रमाण कमी झालं. जॉर्जिया विद्यापिठाचे प्राध्यापक एडम चेन म्हणाले की, या गेममुळे मानसिक स्वास्थ्य चांगलं होण्यास मदत होते.

गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये मानसिक आरोग्य चांगलं राहणं हा फार महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. जागतिक पातळीवर 17 टक्के चीनमधील नागरिक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. यामुळेच संशोधकांनी त्यांच्या रिसर्चमध्ये 45 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जवळपास 11 हजार चीनी नागरिकांचा समावेश केला.

यात त्यांनी नैराश्याची लक्षणं पाहिली आणि त्याची तुलना मित्र- परिवारासोबत वेळ घालवणं, माहजोंग खेळणं, एखाद्या खेळात किंवा सामाजिक क्लबमध्ये सहभागी होणं किंवा सामाजिक कार्य करणं असे सर्व पैलू तपासून पाहिले. यात त्यांनी पाहिले की, निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे हे चांगल्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. त्यातही शहरी भागात माहजोंग हा खेळ खेळणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. ज्या व्यक्ती नैराश्यग्रस्त होत्या आणि त्यांनी माहजोंग हा गेम खेळायला सुरुवात केल्यापासून त्यांच्यातील नैराश्य कमी झाल्याचे दिसले.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

कार्डियक अरेस्ट येतो कसा.. जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

Loading...

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

सेल्फीमुळे कळतील तुमची गुपितं, सांभाळून काढा PHOTO!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...